सोलापूरसामाजिक

सोलापुरात मुस्लिम समाजबांधवातर्फे श्रीराम प्रतिमेवर पुष्पवृष्टी

सोलापूर : जुळे सोलापूर भागातील कल्याणनगर येथे हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून आयोध्यातील श्रीराम मंदिरात स्क्रीनच्या प्राणप्रतिष्ठापनानिमित्त श्रीरामाच्या प्रतिमेवर गुलाबपुष्पवृष्टी एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

कल्याणनगर येथे श्रीरामाच्या प्रतिमेचे समाजसेवक विश्वनाथ शेवगावकर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी मुस्लिम समाजाच्यावतीने श्रीरामाच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना गुलाबपुष्प देऊन श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेच्या शुभेच्छा दिल्या. प्रभू श्रीराम हे   आदर्श पुत्र होते. आदर्श बंधुता, आदर्श मित्रता जोपासणारे एक वचनी राजा होते. त्यांच्या रामराज्यामध्ये सर्व जाती-धर्माची प्रजा सुखी समाधानी होती त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्यावतीने हिंदू मुस्लिम एकत्र येऊन ‘हम सब एक है व जय सियाराम” अशा घोषणा दिल्या. या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की हिंदू मुस्लिम समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा, भाईचारा निर्माण व्हावा, समाजामध्ये शांतता, एकी राहावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम,  इरफान मंगलगिरी, रसूल पठाण, हमीद सय्यद, सद्दाम शेख, मुसा अत्तार, बेकरीवाले शेख,  सईद सय्यद सुभान शेख, मयूर खमितकर, अरविंद शेळके, बबन डिंगणे, सुनील निकम, ओंकार कदम, किशोर कदम, ज्ञानेश्वर पवार, अनिल गवंडी, अमित पाटील, नितीन गायकवाड, गिरीश खेळाडू, श्रीशैल बोरोटे, शिवशरण बोरोटे, दत्ता जाधव, विकी पाटील, रमेश चव्हाण, रवी स्वामी, विजय पवार, महेश दुधाळ, कृष्णा झिपरे, निलेश आवटे, विकास बचुटे आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर सोलापुरात फटाक्याची आतिषबाजी करून दिवाळी साजरी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button