सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

बापरे… सीसीटीव्हीत दिसली कॉपी; मोरोचीच्या प्राचार्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सोलापूर : जिल्हा प्रशासनाने बारावी परीक्षेचेवेळी कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कॉपीचा प्रकार आढळून आला आहे. याप्रकरणी माळशिरस तालुक्यातील मोरोची येथील दी विविधांगी मॉडेल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दक्षता समितीचे सचिव तथा माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी दिले आहेत.

बारावी परीक्षेच्या वेळेस सोलापूर जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षण विभागाने सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा प्रयोग केला आहे. परीक्षा केंद्रावरील सर्व सीसीटीव्ही जिल्हा परिषदेत असलेल्या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षातील कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर लक्ष ठेवून असतात. रसायनशास्त्राच्या पेपरवेळी माळशिरस तालुक्यातील मोरोची येथील दि मॉडेल विविधअंगी कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी कॉपी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ दक्षता समितीचे सचिव शिक्षणाधिकारी जगताप यांना ही कल्पना दिली. जगताप यांनी परीक्षा केंद्रप्रमुख तथा प्राचार्यांशी संपर्क साधला. प्राचार्य व इतर शिक्षकांनी परीक्षा कक्षात धाव घेतल्यावर संबंधित विद्यार्थिनीकडे कॉफी आढळली. हा प्रकार गंभीर असून कॉफीमुक्त अभियानाला छेद देणारा असल्याचे निदर्शनाला आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी या परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख तथा प्राचार्य कल्लाप्पा बिराजदार यांच्यावर गुन्हा दाखल करून याबाबतचा अहवाल तात्काळ कार्यालयाला सादर करावा असे आदेश माळशिरसच्या गटशिक्षणाधिकाऱ्याला दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button