सोलापूर : झेडपीच्या जलजीवनची सर्व कामे शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात सोलापूर झेडपी राज्यात नंबर वन ठरली आहे.
शासनाच्या आयएमआयएस या साईटवर सर्व पाणी पुरवठा योजनांचे प्रमाणीकरण करायचे होते. सोलापूर जिल्हयाने सर्व 1 हजार 525 योजनांचे 2 हजार 313 उद्भव प्रमाणीकरण गुरुवारी पूर्ण केले. महाराष्ट्रातील 34 जिल्हयामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने हे काम मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांच्या टीमने सर्वप्रथम केले आहे.


More Stories
आरोग्य विभागातील कंत्राटी कायम झाले मग आमच्यावरच अन्याय का? झेडपी स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा सवाल
अक्कलकोटमध्ये भर पावसात शाळांची न्यायाधीशांकडून तपासणी; निकृष्ट पोषण आहार नष्ट करण्याचे आदेश
पंढरीच्या स्वच्छता मोहिमेत झेडपीचे 250 कर्मचारी