सोलापूरनिवडणूकराजकीय

काँग्रेसला पोलिंग एजंट मिळणार नाही म्हणणाऱ्या मोहोळमधून मिळाला इतका मोठा लीड

दक्षिण सोलापूर, अक्कलकोट भाजपच्या बालेकिल्लालाही पडले खिंडार

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोहोळ विधानसभा मतदार संघातून 63 हजार 157 मताची आघाडी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मोहोळ मध्ये मतदान केंद्रावर पुलिंग एजंट मिळणार नाही असा दावा करणाऱ्यांना हा मोठा चपराक बसला आहे.

काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात मोहोळ तालुक्याने मोठा वार्ता उचलल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस माजी आमदार राजन पाटील भाजपच्या बाजूने गेले होते. पहिल्याच बैठकीत त्यांनी मोर्चा उमेदवाराला मतदान केंद्रावर पोलिंग एजंट मिळणार नाही असा जाहीर दावा केला होता. पण मतदारांनी त्यांचा हा दावा फोल ठरवला आहे.  मनात आणले तर मतदार काय करू शकतात हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी यापूर्वीच हा दावा केला होत मतदारांनी आमदारांना खिशात घातले आहे असे त्यांनी जाहीर केले होते त्यांचा हा दावा खरा ठरला आहे.

पंढरपूर- मंगळवेढा, दक्षिण सोलापूर व त्यानंतर अक्कलकोट तालुक्यातही काँग्रेसला चांगले मतदान झाले आहे. विशेष म्हणजे या तिन्ही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. दक्षिण सोलापुरात जवळपास 11 हजाराचा लीड काँग्रेसला मिळाला आहे. या ठिकाणी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे व माजी आमदार दिलीप माने यांनी फिल्डिंग लावली होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जनतेचा हा कौल मान्य केला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दुरावलेले जुने सहकारी एकत्र करून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पहिली महिला खासदार म्हणून आपली लेक आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव करण्यात यश मिळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button