सोलापूरनिवडणूकराजकीय

सोलापूर उत्तरमध्ये कोठेही एकच नाव “विजयमालक’

विजयकुमार देशमुख यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद

सोलापूर : घराघरात परिचित असलेला आमदार विजयकुमार देशमुख यांचं नाव हे स्वच्छ प्रतिमेचं आणि विकासाचं शाश्वत नाव आहे. त्यामुळे उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारात सध्या एकच नाव घुमत आहे ते म्हणजे मालक. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून “मालक आप आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले आहे.

या मतदारसंघातील कोंडी गावात यंदा नऊ ते दहा कोटी रुपये पर्यंतची काम झाली आहेत. कोंडी गावावर आमदार देशमुख यांचे विशेष प्रेम आहे त्यामुळे आम्ही कोंडी भागातून मालकांना एकतर्फी मतदान करून दाखवू असे कोंडी येथील संजय पवार यांनी सांगितले.आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशिवाय आमच्या गावाला कुठल्याही पक्षाचा वा आघाडीचा एक रुपयाही निधी आजपर्यंत देण्यात आला नाही. ज्या काही सुविधा गावात आल्यात ते फक्त आमदार देशमुख यांच्यामुळेच.आम्ही सर्व ग्रामस्थ एकमताने महायुतीचे उमेदवार विजय देशमुख यांना निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत असे महादेव राठोड यांनी सांगितले.आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी कोंडी आणि तांडा येथील गाव भेटीत सरपंच मनोज निंबाळकर, उपसरपंच शिवाजी निळ, भारत पाटील, दत्तात्रय भोसले, गणेश भोसले, राहुल निंबाळकर, बाळासाहेब मोरे, राजेंद्र भोसले, लक्ष्मण साबळे, किसन भोसले, सुदर्शन माळी, दत्ता वाघमारे, खलील सय्यद, बालाजी भोसले, तुकाराम पवार, शंभुराजे निळ, नामदेव सुतार, भास्कर सुतार, शंकर राठोड, विकास चव्हाण, सुरेश राठोड, गौतम वाघमारे यांच्यासह सर्व ग्रामस्थ समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि माता-भगिनींची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.मागील दहा वर्षात ज्या काही सुविधा राज्य सरकारकडून देण्यात येतील त्या देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. येथील शेतकऱ्यांचा आणि युवा वर्गाच्या रोजगाराचा प्रश्न निवडणुकीनंतर राज्य सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिले.आमच्या गावात सार्वजनिक दिवाबत्ती नव्हती. संपूर्ण गावात अंधार होत. आमदार देशमुख यांच्या प्रयत्नाने गावात लाईटची व्यवस्था आली. बंदिस्त ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे. आमच्या ग्रामदेवताच्या मंदिरासमोर सुशोभीकरण झालेले आहे. रस्त्यांची सुविधा सुरू आहे. यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ देशमुखांच्या कार्यपद्धतीवर समाधानी असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीत देशमुख यांचा भरघोस मतांनी विजय होईल असे कोंडी तांडा येथील राठोड यांनी सांगितले.शहर उत्तरला हा भाग जोडल्यापासून गावामध्ये विकास काय असतो हे कळाले आहे. आमदार देशमुख जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आमच्या गावांमध्ये विकास कामांना गती आली. गावात कोट्यावधीची कामे झाली. विरोधी पक्षातील उमेदवार कोण आहेत हे आम्हाला माहितीच नाही. आमच्या ग्रामस्थांच्या प्रत्येक मागणी देशमुख मालकांनी पूर्ण केले आहे येत्या २३ तारखेला आम्ही पण आमचा दिलेला शब्द पूर्ण करून दाखवू आणि पाचव्यांदा विधानसभेत देशमुख यांचे नाव पोहोचवू. असा शब्द संजय पवार यांनी दिला.यावेळी सुतार परिवार आणि माळी वस्तीवर देशमुखांचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि माता भगिनींच्या वतीने औक्षण केले.

बाळेत जेसीबी मधून पुष्पवृष्टी

लोकसभेला बाळे भागात भाजपचे उमेदवार यांना आम्ही लीड दिला होता. त्यापेक्षाही जास्त महायुतीतील सर्व पक्ष मिळून आम्ही एकदिलाने काम करू आमदार देशमुख यांना सर्वाधिक मताधिक्य देऊ. येणाऱ्या विधानसभेत एक लाख मताधिक्याने शहर उत्तरच नाव गाजवू असे बाळे येथील भाजपचे कार्यकर्ते राजाभाऊ आलुरे यांनी सांगितले.विकास कामाच्या जोरावर आमदार देशमुख पाचव्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत बाळे भागात अनेक चांगले बदल मागील सात आठ वर्षात झाले आहेत. किनारा निवडणुकीत शहर उत्तरचा विजय हा आमचाच असणार असे माजी नगरसेविका ज्योती बमगुंडे आणि स्मिता भावे यांनी सांगितले.महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ बाळ येथे बुधवारी सायंकाळी पदयात्रेत उत्स्फूर्तपणे परिसरातील नागरिक माता भगिनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आमदार देशमुख यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच चौकाचौकात नागरिकांनी फटाक्याची आतिषबाजी करून आमदार देशमुख यांचे स्वागत केले. या रॅलीत शेकडो नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. आमदार देशमुख यांच्या प्रचार रॅलीच्या धडाक्यामुळे उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात “मालक’ हे एकच नाव गाजत असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button