सोलापूरआरोग्यजिल्हा परिषद

सोलापूर झेडपी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न पंधरा दिवसात मार्गी लागणार

सोलापूर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना शाखा सोलापूर व जिल्हा परिषद आरोग्य विभाग प्रशासन यांची संयुक्त बैठक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. या बैठकीत डीएचओ कोपूरवाड यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न पंधरा दिवसात सोडवण्याचे आश्वासन दिले.

यावेळी झालेल्या चर्चेतील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

पदोन्नती: MPW, ANM, HA, LHV पदांच्या नियमित पदोन्नती 15 सप्टेंबरपर्यंत मार्गी लावण्याचे आश्वासन.

आश्वासित प्रगती योजना: 10, 20, 30 वर्षांच्या कालबद्ध पदोन्नतीची फाईल GED मध्ये असल्याची माहिती.

पदनाम बदल: आरोग्य सहाय्यकचे पदनाम आरोग्य निरीक्षक करण्याबाबत GR पाहून कार्यवाही करण्याचे आश्वासन.

सातवा वेतन आयोग: खुल्लर समितीच्या शिफारसीनुसार ज्यांचे वेतन निघाले नाही, त्यांचे वेतन 10 दिवसात काढून फरकाची रक्कम अदा केली जाईल.

लस पुरवठा: जिल्हा स्तरावरून लस थेट PHC ला पोहोचवली जाणार, पेट्रो कार्डची सुविधा लवकरच.

वैद्यकीय बिले: प्रलंबित वैद्यकीय बिले 8 ते 10 दिवसात मार्गी लावली जातील.

या बैठकीला अतिरिक्त DHO डॉ. घाडगे, प्रशासन अधिकारी गिरीश जाधव यांच्यासह संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे, उपाध्यक्ष श्रावण मोरे, समीर शेख, धनाजी मस्के, संगीत हांडे, राणी सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button