निवडणूकमहाराष्ट्रराजकीयसोलापूर

Bjp: सोलापूर मध्य देवेंद्र; उत्तर, दक्षिणमध्ये देशमुखच

दोन्ही देशमुखाना विरोध करणारे आता वरमले

सोलापूर : भाजपतर्फे सोलापुरातील तीन मतदारसंघातून शुक्रवारी उमेदवार फिक्स झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापूर शहर मध्य मधून देवेंद्र कोठे तर उत्तरमधून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख आणि दक्षिण सोलापूरमधून आमदार सुभाष देशमुख यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे.

विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी फिक्स करण्यासाठी मुंबईत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकांमधून सोलापूर मधील उमेदवार फिक्स झाल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे कोठे यांना सोलापूर शहर मध्य मधून उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीत ही जागा कोणाला मिळणार यावर बरीच चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनीही या ठिकाणी उमेदवारी मिळण्यासाठी धडपड सुरू केली आहे. पण यापूर्वी भाजपने ही जागा लढवली होती. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीत ही जागा भाजपलाच मिळणार असे सांगितले जात आहे. त्यामुळे देवेंद्र कोठे हे भाजपचे उमेदवार असणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सोलापूर शहर उत्तर व दक्षिण सोलापूरमधून विद्या आमदारांना विरोध करणारे मुंबई धडकले होते. आमदार सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात निवेदने गेली होती. सुभाष देशमुख यांच्याविरुद्ध त्यांचेच गट सक्रिय झाल्याचे दिसून येत होते. पण भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विद्यमान आमदार दोन्ही देशमुख यांचे तिकीट पुन्हा फिक्स असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दोन्ही देशमुखांना विरोध करणाऱ्यांची हवा फुस्स झाली आहे. आपल्यालाच उमेदवारी मिळणार म्हणून कामाला लागलेले इच्छुकही आता वरमले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button