सोलापूरजिल्हा परिषद

झेडपी भरतीत 49 जणांची शिपाई तर 21 जणांची ग्रामसेवकाला पसंती

सोलापूर : जिल्हा परिषद प्रशासनाने राबवलेल्या अनुकंपा भरतीत 49 जणांनी शिपाई तर 21 जणांनी ग्रामसेवक होण्याला पसंती दर्शवली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी गुरुवारी अनुकंपा भरती प्रक्रिया व नियुक्ती अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडली. या भरतीत अनुकंपा प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना त्यांच्या शिक्षणाानुसार शिपाई ते कनिष्ठ सहाय्यक अशा बारा संवर्गावर नियुक्ती देण्यात आल्या. शिक्षणाप्रमाणे 49 जण परिचर गट ड पदासाठी पात्र ठरले. 21 जण ग्रामसेवक झाले तर 14 जण स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक आणि बाराजण कनिष्ठ अभियंता झाले आहेत. इतर पदासाठी पात्र ठरलेले पुढील प्रमाणे आहेत. वरिष्ठ सहाय्यक: चार, विस्तार अधिकारी सांख्यिकी: एक, अंगणवाडी पर्यवेक्षिका: एक, उपशिक्षक मराठी: चार, आरोग्य सेवक (चाळीस टक्के): दहा, आरोग्य सेवक (50 टक्के): सात, औषध निर्माण अधिकारी: एक.

प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे व रिक्त जागाप्रमाणे नियुक्त्या देण्यात आले आहेत. यामध्ये गतवर्षीच्या रिक्त जागा प्रमाणे 20% नुसार 73 जण तर चालू वर्षाच्या जून अखेर दहा टक्के प्रमाणे 51 जण पात्र ठरले आहेत. गेल्या पाच वर्षात ही सर्वात मोठी भरती झाली आहे. भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे व नियुक्त्या उमेदवारांच्या इच्छेप्रमाणे देण्यात आले आहेत.

सीईओ कुलदीप जंगम यांनी आषाढी वारी नंतर लगेच अनुकंपा भरतीची मोहीम हाती घेतली. प्रत्येक फाईल तपासणे ही मोठी जबाबदारी होती. बरेच टेन्शन होते. पण तरीही ही प्रक्रिया सर्वांच्या सहकार्याने सुरळीत पार पडल्याबद्दल आनंद वाटत आहे. 

स्मिता पाटील 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button