सोलापूरजिल्हा परिषद

सीईओ कुलदीप जंगम यांचा दणका; नागेश पाटील यांची स्थानांतरण बदली

सोलापूर : जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला असताना मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी सर्वसाधारण बदल्यावेळी झालेल्या गडबडीतील आरोग्य विभागातील नागेश पाटील यांना दणका दिला आहे.

जिल्हा परिषदेत सध्या तदर्थ पदोन्नतीवरून नियुक्ती हा विषय गाजत आहे. अशात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण बदल्यांमधील तक्रारीवर दणका दिला आहे. सर्वसाधारण बदल्यांमध्ये आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांना बदल्यांमधून वाचविण्यासाठी सूट दिल्याची तक्रार करण्यात आली होती. आरोग्य विभागातील कनिष्ठ प्रशासनाधिकारी नागेश उर्फ नागनाथ पाटील यांना बदलीतून वाचविण्यात आल्याचे बोलले जात होते. या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश सीईओ जंगम यांनी दिले होते. चौकशीत ही गडबड लक्षात आल्यानंतर त्यांनी अखेर मुख्यालयात ठाण मांडून बसलेल्या पाटील यांना कुर्डूवाडी पंचायत समितीकडे स्थानांतर बदलीने पाठवले आहे. विशेष म्हणजे कनिष्ठ प्रशासन अधिकारी गिरीश जाधव यांना आरोग्य विभागातच आरक्षण विरहित खुल्या प्रवर्गातून सहाय्यक प्रशासन अधिकारीपदी पदोन्नतीवरून नियुक्ती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button