सोलापूर : जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी म्हणून जात पडताळणी समितीकडील सदस्य सचिन कवले यांना देण्यात आलेला अतिरिक्त पदभार गुरुवारी काढण्यात आला आहे.
जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार दिलेले सचिन कवले यांचा पदभार रद्द करून त्यांच्या ठिकाणी समाज कल्याण सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तत्कालीन समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्यावर कारवाई झाल्यानंतर कित्येक दिवस हे पद रिक्तच होते. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. चार महिन्यापूर्वी जात पडताळणी समितीकडील सचिन कवले यांच्याकडे समाज कल्याणचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. पण त्यांची कारकीर्द वादळी ठरली. लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आल्यानंतर कवले यांचा पदभार काढून सोनवणे यांच्याकडे देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


More Stories
सोलापूरचा बारावीचा निकाल 87%; कॉपीमुक्त अभियानाचा दिसला प्रभाव
बोरामणीत तलवारीने वार करून माय लेकरांसह तिघांचा खून
गड संवर्धनासाठी जाणाऱ्या मावळे व खासदार लंके यांचा सन्मान