जिल्हा परिषदसोलापूर

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दाखवली कला

सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट मोहोळ संचलित साईबाबा मतिमंद निवासी विद्यालय आणि मूकबधिर निवासी शाळेच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.

जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मनोज राऊत यांच्याहस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमास सहाय्यक निबंधक तेलंगरे, नीलकंठ उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. तसेच जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी राऊत व तेलंगरे यांच्याहस्ते दिव्यांग चिमुकल्यांचा जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.

टेंभुर्णी शाळेत कार्यक्रम…

जनजागृती प्रबोधन मंच संचलित टेंभुर्णी येथील मूकबधिर शाळेमध्ये दिव्यांग दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. माहिती अधिकार कार्यकर्ते मारुती जाधव यांनी दिव्यांग मुलांशी संवाद साधून त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे कौतुक केले. शेवटी मुख्याध्यापिका शैलजा पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button