सोलापूरजिल्हा परिषदसंघटना-संस्था

जि.प. कर्मचारी पतसंस्थेच्या कॅलेंडरचे प्रकाशन

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पत संस्था नियमित नं. १ सोलापूर या पत संस्थेच्या सन २०२६ या दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहीणकर यांचेहस्ते करण्यात आले.

या दिनदर्शिकेत स्व. विवेक लिंगराज यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलेले आहे. विवेकानंदाचा शिधा या संकल्पनेतुन त्यांनी पतसंस्था व जिल्हा परिषदेसाठी दिलेले योगदान व केलेले विविध सामाजीक कार्य यास उजाळा दिला आहे. दिनदर्शिकेत दिलेल्या क्युआर कोडमध्ये सर्व फोटो व अधिकारी यांचा अभिप्राय दिलेला आहे. संस्थेच्या संचालक मंडळाने हे चांगले कार्य केले असलेचे मत कोहीणकर यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी हे उपस्थित होते. ही दिनदर्शिका सभासदांना मोफत देण्यात येते. संस्थचे भाग भांडवल १८ कोटी ७१ लाख असुन वचत ठेव ६ कोटी पंधरा लाखाची आहे. संस्थेची रिर्झव्ह फंड २कोटी ८८ लाख एवढा आहे. कर्ज मर्यादा ७ लाख व तातडी कर्ज मर्यादा ५० हजार आहे. व्यजाचा दर ६ टकके आहे. चेअरमन एस ई राऊत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. माजी तज्ञ संचालक श्रीशैल देशमुख यांनी आभार मानले. या कार्यकमाचे सुत्र संचलन डॉ. एस. पी. माने यांनी केले. याप्रसंगी संचालक व्ही. वी. पाटील, शहाजहान तांबोळी, सुरेश कुंभार, जी. एम. मारडकर, एस. डी. म्हमाणे, टी. ए. मुतवल्ली, एस एच राठोड, के. जी. लालवोंद्रे, विशाल घोगरे , सौ. एम. एस शिंदे, सी. ए. वाघमारे, आर आर घुले, व्ही. एम. घेरडे, व्ही. के. शिंदे, तज्ञ संचालिक डॉ. पी. वी. नवले, के. एन. खुर्द स्वि संचालक संस्थेचे सचिव डी. एल. देशपांडे कर्मचारी, सुभाष काळे, विनोद कदम उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button