February 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

मंद्रूप जिजाऊ मराठा सेवा संघ अध्यक्षपदी मनीषा खराडे तर उपाध्यक्षपदी आशा सारोळे

सोलापूर : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील राष्ट्रमाता जिजाऊ मराठा महिला सेवा संघाचा वार्षिक मेळावा होऊन सन 2026–27 या वर्षाच्या अध्यक्षपदी मनीषा नितीन खराडे तर उपाध्यक्षपदी आशा दामाजी सारोळे तर सचिवपदी माधुरी प्रशांत बाबर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

राष्ट्रमाता जिजाऊ मराठा महिला सेवा संघाची स्थापना तीन वर्षापूर्वी करण्यात आली आहे. महिला सेवा संघातर्फे दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊ मांसाहेब यांच्या जयंतीनिमित्त महिला व युवती मेळावा घेतला जातो. सालाबादपमाणे यंदा खराडे यांच्या निवासस्थानी महिला व युवती मेळावा झाला. प्रारंभी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित युवतीनी गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले. यात वर्षा सुभाष साठे यांनी सादर केलेल्या भजनाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सन 2026 – 27 च्या नवीन कार्यकारणी समितीची निवड करण्यात आली. यावेळी मावळत्या अध्यक्ष सुजाता रमेश नवले, उपाध्यक्ष चैताली शिवणकर, सचिव अनिता गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. दादा साठे यांनी समाजातील महिलांनी पुढाकार घेत मुलांवर योग्य संस्कार आणि कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी बचत गट सक्रिय  करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती गायकवाड, प्रणिती शिंदे यांनी केले.