March 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

शंभर दिवसाच्या कार्यक्रमात सोलापूरचा आरोग्य विभाग अव्वल

सोलापूर : 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात राज्याच्या सर्व 358 तालुक्यातील 10,000 शासकीय कार्यालयांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. दुसऱ्या टप्प्यातील पुरस्कारांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली आहे. यामध्ये  सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य कार्यालयाने यात आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे.

सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक महसूली विभागातील उत्कृष्ट 3 तालुका कार्यालयांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर या सर्वच तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. पुरस्कार मिळालेल्या गटांमध्ये शहर पोलीस, महसूल कार्यालयांचा समावेश दिसून आलेला नाही. त्यामुळे भविष्यात या कार्यालयांमध्ये या सुधारणांचा समावेश करणे गरजेचे ठरले आहे. जिल्हा परिषद व सार्वजनिक आरोग्य अंतर्गत आरोग्य केंद्र, बीडीओ, पशुसंवर्धन कार्यालयांना पुरस्कार मिळाला आहे.

शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मिळालेली कार्यालय पुढीलप्रमाणे आहेत. पुणे विभाग.. सोलापूर जिल्ह्यातील कार्यालय. आरोग्य विभाग : ग्रामीण रुग्णालय अकलूज प्रथम, द्वितीय पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय, तृतीय बार्शी रुग्णालय. गटविकास अधिकारी: अक्कलकोट गटविकास अधिकारी तृतीय. प्राथमिक आरोग्य केंद्र: तालुका वैद्यकीय अधिकारी माढा, प्रथम. द्वितीय माळशिरस. जलसंपदा विभाग : उजनी कालवा उपविभाग क्र.16, प्रथम. सहाय्यक निबंधक : सहाय्यक निबंधक कार्यालय उत्तर सोलापूर, तृतीय. बाल विकास प्रकल्प : सोलापूर शहर पश्चिम, द्वितीय. सोलापूर शहर पूर्व, तृतीय. प्रकल्प अधिकारी: वैराग बाल विकास प्रकल्प अधिकारी, तृतीय. सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त : तालुका पशु चिकित्सालय पंढरपूर, द्वितीय.