सोलापूरक्राईम

व्हेरी गुड..! कोल्हापूरच्या डीआयजीकडून सोलापूर एलसीबी टीमचे कौतुक

सोलापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून सोलापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे.

रेकॉर्डवरील सराईत अंतरजिल्हा ३ गुन्हेगार जेरबंद करून त्यांचेकडून ४ जबरीचोरीचे व ३ वाहन चोरी व १ आर्म अॅक्ट असे एकूण ८ गुन्हे उघडकीस आणून २ देशी बनावटीचे पिस्टल, ३ जिवंत काडतूसे, ५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यासह, २ कार, ३ मोटारसायकल, ३ मोबाईल फोन असा एकूण १२ लाख ५ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.  या प्रकरणात  चैतन्य उर्फ भैय्या पांडूरंग शेळके (वय २३ वर्षे रा. भोत्रा, ता. परांडा जि. धाराशिव),  करण शिवाजी भोसले (वय २२ वर्षे, रा. खांडवी ता. बार्शी जि. सोलापूर),  मारूती नागनाथ माने (रा. सुकटा ता. भुम जि. धाराशिव) या आरोपीला अटक करण्यात आली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व स्थानिक गुन्हे अन्वेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या टीमचे कौतुक करण्यात आले आहे. त्याबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या टीमचा विशेष सन्मान केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button