March 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

अंबिकानगर झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांची बग्गीतून मिरवणूक

सोलापूर : विध्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शिक्षक व शासन प्रयत्नशील असून त्यासाठी पालकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे,असे मत माजी पालकमंत्री व शहर उत्तरचे विद्यमान आमदार  विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.

अंबिकानागर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत आमदार देशमुख यांनी केले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार, जिल्हा परिषद मुख्यालय शिक्षण विस्तार अधिकारी हरीश राऊत, तालुका वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत ऐवळे उपस्थित होते.

प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पहिली वर्गाच्या विध्यार्थ्याची वाजता गाजत बग्गीमधून मिरवणूक काढण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आमदार विजयकुमार देशमुख व उपस्थित मान्यवर यांनी केले.

विध्यार्थ्यांना शाळेच्या प्रथम दिवस निमित्त गणवेश, पाठयपुस्तक, बूट, स्कुल बॅग व लेखन साहित्य आदीचे वितरण पाहुण्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अंबिकानगर परिसरातील आनंद भंवर यांच्यावतीने विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आमदार विजयकुमार देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. केंद्रप्रमुख जीवराज खोबरे, राजाभाऊ आलूरे,विनय ढेपे, अलका भवर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा लक्ष्मी कनकधर, डाटा एंट्री ऑपरेटर म्हताब शेख व आण्णाराव रणशूर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक सिद्धाराम माशाळे यांनी केले. सूत्रसंचालन शिवशंकर राठोड यांनी केले. आभार प्रदर्शन शिवाजी वडते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वैशाली गोंदकर,श्रीमती रसिका बंदिछोडे यांनी परिश्रम घेतले.