सोलापूरजिल्हा परिषद

पीएच्या शिफारसीसाठी सीईओच्या बंगल्यावर मारले हेलपाटे

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक पद गेल्यानंतर ते पद पुन्हा मिळवण्यासाठी सुधाकर माने यांनी सीईओंच्या बंगल्यावर अनेक हेलपाटे मारल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यक पदावर प्रति नियुक्ती विभागीय आयुक्तांनी दिल्याने राज्यभरात हा चर्चेचा विषय झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे स्वीय सहाय्यक सुधाकर माने यांची अक्कलकोट ग्रामीण पाणीपुरवठा विभागात बदली झाली. त्यामुळे सीईओ जंगम यांनी स्वीय सहाय्यक पदातून त्यांना कार्यमुक्त करून अक्कलकोट पंचायत समितीत पदभार घ्यावयास लावला. त्यामुळे सीईओंचे पीए कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पीएचची खुर्ची गेल्यानंतर देशमुख अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. हे पद पुन्हा मिळावे म्हणून त्यांनी सीईओंच्या बंगल्यावर हेलपाटे मारण्याचे प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्याच नावाची पुन्हा शिफारस झाल्याची चर्चा आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत असे पहिल्यांदा घडले आहे. स्वीय सहाय्यक पदावरून गेलेले कर्मचारी पुन्हा झेडपीत आलेले नाहीत. अशात पुन्हा वादग्रस्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिफारशीमागे कोण?

वास्तविक माने यांनी यापूर्वीच स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला होता. तसा अर्ज ही त्यांनी प्रशासनाकडे दिला होता असे सांगण्यात येत आहे. पण यातून त्यांनी पुन्हा माघार घेतली. अक्कलकोटला बदली झाल्यानंतर पदभार सोडावा लागला. त्यामुळे ते बेचैन झाल्याचे दिसून आले. त्यांना पुन्हा या पदावर आणण्याबाबत कोणी शिफारस केली? अशी चर्चा आता जिल्हा परिषदेत रंगली आहे. विशेष म्हणजे याहून अनेक गंभीर प्रस्ताव प्रलंबित आहेत. मग या पदाबाबत इतकी घाई का करण्यात आली? याबाबत वेगवेगळी चर्चा रंगली आहे. जिल्हा परिषदेत अनेक गडबडी झाल्या आहेत. त्यावर पांघरून घालण्यासाठी तर ही घाई झाली नाही ना? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button