January 14, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

साडेपाच हजार पोलिसांना मिळणार 300 कोटीचे गृह कर्ज

सोलापूर: पोलिसांना घर बांधण्यासाठी ३०० कोटीचे डीझी लोनच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्याने अर्ज केलेल्या राज्यातील साडेपाच हजार पोलीस बांधवांच्या गृह कर्जाची सोय झाली आहे, अशी माहिती पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्रचे राज्य समन्वयक मनोज देवकर यांनी दिली.

मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनामुळे पोलिसांना त्यांच्या हक्काचे घर प्रदान होणार होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासूनच्या पोलीस बॉईज असोसिएशनच्या पाठपुरावाला यश आले आहे. पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्रचे राज्य समन्वयक मनोज देवकर यांनी व महाराष्ट्रातील त्यांची पूर्ण टीम सातत्याने पोलिसांच्या समस्यांच्या निवारणासाठी कार्य करत आहेत. पोलीस बॉईज ही संघटना पोलिसांच्या मुलांनी काढलेली संघटना आहे. ही संघटना पोलिसांच्या पालकांच्या व बांधवांच्या तसेच पोलीस मित्रांच्या समस्यांच्या मदतीसाठी नेहमी लढा देत असते. प्रमोद वाघमारे यांनी पोलिसाच्या बॉईज असोसिएशनची स्थापना करून त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही संघटना कार्यरत केली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना गृह कर्ज मंजूर करण्याबाबत निवेदन दिले होते. यावेळी त्यांच्यासमवेत बैठकीत झाली होती. अखेर या पाठपुरावला यश आले असून पोलिसांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी 300 कोटी डिझी लोन मंजूर करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील ५ हजार ४९१ पोलीस बांधवांनी अर्ज केला होता. सातत्याने पाठपुरावामुळे केल्याने तो यशस्वी झाला, अशी माहिती राज्य समन्वयक मनोज देवकर यांनी दिली.