February 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर जिल्हा विकास यंत्रणेचे सुधीर ठोंबरे यांची हिंगोलीचे एडिशनल सीईओ म्हणून बदली

सोलापूर: सोलापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांची हिंगोलीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. तसेच सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूर्यकांत भुजबळ यांची नियुक्ती झाली आहे.

ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी दर्जाच्या साधारण ४५ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या तर २१ अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीपर्यंत १ वर्षाची मुदतवाढ दिली आहे. बदल्या झालेल्या अधिकार अधिकारी खालील प्रमाणे आहेत.

१. परमेश्वर राऊत,उमेद कक्ष,बेलापूर ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा

२. मनोज जाधव,पी डी अकोला ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,सांगली

३. विश्वास सिद,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,सातारा ते पी डी सातारा

४. विकास जाधव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,धाराशिव ते पी डी बीड

५. विजय मुळीक,अपर आयुक्त(विकास), ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर

६. व्ही पी सोळंके,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर

७.सुधीर ठोंबरे पी डी सोलापूर ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली

८. अनुप शेगुलवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली ते पी डी धाराशिव

९. पी आर पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा

१०. पी डी यादव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी ते पी डी रत्नागिरी

११  आर व्ही इंगळे,पी डी बुलढाणा ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,धुळे

१२. एम टी चौधर सहाययक आयुक्त (विकास) नाशिक ते उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा प्र ),जिल्हा परिषद भंडारा

१३. चंद्रकांत यादव ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,नंदुरबार

१४. आर एस लाहोटी,सह आयुक्त (चौकशी),छत्रपती संभाजीनगर ते सह आयुक्त (विकास),नाशिक

१५. दत्ता गिरी,(प्रतीक्षेत), आता उप मुख्य कार्यकारी अधिकारी,(ग्रा पं) जिल्हा परिषद,नांदेड