सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपीचे ६ गुरुजी पदोन्नतीने झाले विस्तार अधिकारी

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील सहा गुरुजींचे भाग्य उजळले आहे. सीईओ कुलदीप जंगम यांनी या सहा शिक्षकांना पदोन्नतीने विस्तार अधिकारी पदी समुपदेशाने मंगळवारी नियुक्ती दिल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

प्राथमिक शिक्षण  विभागातर्फे वर्ग-३ श्रेणी ३ च्या कर्मचाऱ्यांना विस्तार अधिकारीपदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मंगळवारी राबवली. यात सहा मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्यात आली त्यांची नावे, सध्या कार्यरत व पदोन्नतीने नियुक्ती झालेले ठिकाण पुढील प्रमाणे आहे. मुख्याध्यापक संभाजी सहदेव शिंदे (सिध्दापूर ता मंगळवेढा):पंढरपूर, महादेवी चांगदेव गुंड, केंद्रप्रमुख (यशवंत नगर ता. माळशिरस): दहिगांव ता. माळशिरस, प्रभावती भानुदास जगताप,पदवीधर शिक्षक (जातेगांव ता. करमाळा): कोर्टी ता. करमाळा, सैपन. म. अळगी, मुख्याध्यापक (तिल्लेहाळ, ता द. सोलापूर) : होटगी ता. दक्षिण सोलापूर,  कल्लाप्पा नामदेव अजावडरे, मुख्याध्यापक (घोडातांडा ता.द. सोलापूर): माढा ता. माढा, भारत लक्ष्मण बावकर, विषय शिक्षक (सौंदरे ता. बार्शी): आगळगांव ता. बार्शी.

इतर शिक्षकांच्या पदोन्नती यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. वार्षिक परीक्षा व सुट्ट्यामुळे मुख्याध्यापक पदोन्नती थांबल्या होत्या. आषाढी वारी झाल्यानंतर सीईओ जंगम यांनी हा विषय लागलीच हातावेगळा केला. या शिक्षकांना पदोन्नतीने समुपदेशनाद्वारे नियुक्ती देताना प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button