सोलापूर : आषाढी वारी काळात पालखी मार्गावर उघडण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्राला व प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लागणाऱ्या औषधासाठी रात्री अपरात्री मुख्यालयाकडे येणाऱ्या 120 गाड्या औषधे लोड करणाऱ्या फार्मासिस्ट प्रवीण सोळंकी यांचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सन्मान केला.
आषाढी वारी सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आरोग्य विभागाचे मोठ्या नियोजन केले होते. मानाच्या पालख्या जिल्ह्यात आल्यापासून पंढरपुरात पोहोचेपर्यंत वारकऱ्यांची आरोग्य सेवा करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. वारकऱ्यांना औषधोपचार करण्यासाठी साडेतीन कोटीची औषधे खरेदी करण्याची तरतूद करण्यात आली. वारी काळात दोन कोटीची औषधे वापरण्यात आली. दीड कोटीची बचत करून आता कार्तिकी वारीला याचा उपयोग होईल या पद्धतीने औषध वितरणाचे नियोजन करण्यात आले. सोलापूर झेडपीचे सिविल हॉस्पिटलच्या परिसरात असलेल्या मुख्यालयाच्या औषध गोदामातून औषधे पुरवली जातात. फार्मासिस्ट किल्लेदार यांच्या मदतीला प्रवीण सोळंकी यांनी मोठी कामगिरी बजावली. पालखी मार्गावरील सुविधा केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लागणाऱ्या औषधासाठी रात्री गाड्या येत होत्या. या गाड्यांमध्ये औषधे पाठविण्याची मोठी जबाबदारी फार्मशिस्ट सोळंकी यांनी पार पाडली. त्याबद्दल जिल्हा परिषद बीट पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे, राजकुमार सारोळे, रफिक शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत सोळंकी यांचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्याहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

More Stories
महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी दयानंद परिचारक यांची निवड
सोलापूरचे कलेक्टर म्हणून यांच्याकडे असणार पदभार
अडीच वर्षासाठी सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड होणार 18 मार्चला