सोलापूर : अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धा व रंगसाधक पुरस्कार वितरण महोत्सवाचे गेल्या दहा वर्षापासून आयोजन केले जाते. साहित्य, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील संजय सावंत यांची अस्तित्व मेकर्स राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धी व रंगसाधक पुरस्कार वितरण महोत्सव अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, असे आस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे सचिव किरण लोंढे यांनी कळविले आहे.
याप्रसंगी अस्तित्व मेकर फाउंडेशनचे प्रमुख संयोजक ॲड. बसवराज सलगर,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय सांळूखे,सचिव किरण लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले. या राज्यस्तरीय लघुनाटिका महोत्सव स्पर्धेसाठी महाराष्ट्रात लोकप्रिय असणारी टी.व्ही चॅनेलवरील हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.त्याप्रसंगी राज्यस्तरावर नाट्यक्षेत्रात प्रायोगिक रंगभूमीवर योगदान देणाऱ्या जेष्ठ नाट्यकर्मीला राज्यस्तरीय रंगसाधक प्रमोद खांडेकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याचे स्वरूप रोख 11000 रु रोख ,गौरवपत्र व स्मृती चिन्ह असे असणार आहे. हुतात्मा स्मृती मंदिर येथे राज्यस्तरीय लघुनाटिका महोत्सव स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील चुरस पाहता महाराष्ट्रातून जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन महोत्सवाचे अध्यक्ष संजय सावंत व अस्तित्व मेकर फाउंडेशनचे सचिव किरण लोंढे यांनी केले आहे.
ही राज्यस्तरीय लघुनाटिका महोत्सव यशस्वी करण्यासाठी, सचिन जगताप,ओंकार साठे,तिपय्या हिरेमठ सागर देवकुळे, निरंजन राऊळ , धनराज मडगोंड, विश्वेश्वरय्या स्वामी, प्रतीक कसबे,सोमनाथ लोखंडे, श्रवन घोडके,रुद्र बेसरे,अशपाक नदाफ आदी परिश्रम घेत आहेत.

More Stories
सोलापूरची ६० वर्षांची प्रतीक्षा संपली; सोलापूरकरांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची भेट
जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर
सोलापूर झेडपीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलल्या