सोलापूर : शिक्षण राज्यमंत्री राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर या आषाढीवारीनिमित्त पंढरपुरात येत असताना त्यांचा कॅनव्हारस्ता चुकला. त्यामुळे दुचाकीवरून गर्दीतून वाट काढत जाऊन रस्ता दाखवत त्यांना कार्यक्रमस्थळी आणले, असा किस्सा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितला.
पंढरपूरच्या आषाढीवारीत साक्षरता अभियानाचे काम केल्याबद्दल जिल्हा परिषद बीट पत्रकार संघातर्फे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप म्हणाले, आषाढी वारीच्या काळातच मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजात तीन दिवस अडकलो. त्यामुळे साक्षरता वारीच्या प्रचारात सहभागी होता आलं नाही. मात्र समारोप कार्यक्रम थाटात केला. या कार्यक्रमाला शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व महिला आयोगाच्या राज्य अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती .यावेळी शिक्षण राज्यमंत्री भोयर यांनी साक्षरता दिंडी, प्रचार प्रसार तसेच येणाऱ्या अडचणी, झालेले उल्लेखनीय कार्य, यापुढे करायचे कार्य याची सविस्तर माहिती दिली. तसेच माध्यमिक शिक्षण विभागाच्या टीमने केलेल्या कार्याचे कौतुक केले. पुढील काळात अधिक चांगले कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी साक्षरता काळाची गरज असल्याचे सांगितले. आषाढीवारी काळात पालखी मार्गावर शिक्षण विभागाने साक्षरता प्रचाराची जोरदार मोहीम केले. यात पुणे विभागातील अधिकारी सहभागी झाले होते.
कोषागार अधिकारी राऊत यांचा सत्कार
पांगरीतील धनराज हेल्थ अँड स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष उमेश गाढवे यांनी जिल्हा कोषागर पदी नियुक्ती झाल्याबद्दल वैभव राऊत यांचा सन्मान केला याप्रसंगी सेवानिवृत्त पो.हे. कॉन्स्टेबल रहिमबक्ष शेख,फारुख शेख,अन्सार आतार उपस्थित होते.

More Stories
माढा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फलोत्पादन मंत्री गोगावले यांच्याकडून पाहणी
सोलापुरात रमजान ईद उत्साहाने साजरी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सोलापुरात आध्यात्मिक मानवंदना