सोलापूरजिल्हा परिषद

सुधीर ठोंबरे यांची ड्रोन बँक सोलापूरकरांच्या लक्षात राहणार

सोलापूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे यांनी उमेद व घरकुल विभागाचे कामकाज अतिशय उल्लेखनीय केले असल्याने या कामकाजात सोलापूर जिल्हा अग्रेसर असल्याचे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांनी व्यक्त केले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.सुधीर ठोंबरे यांची हिंगोली येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या सत्कार व निरोप समारंभ संपन्न ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, महिला बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, विवेक जमदाडे, शंकर कवितके, जस्मिन शेख, सौ, ठोंबरे, सहाय्यक प्रकल्प संचालक रतीलाल साळुंखे,उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, लेखाधिकारी सूर्यकांत तोडकरी  उपस्थित होते.

यावेळी बोलताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहीनकर म्हणाले की, उमेद अभियान असो की घरकुल विभाग यामध्ये सुधीर ठोंबरे यांनी वेगवेगळया नाविन्यपुर्ण योजना राबवून विभागाचे काम चांगले केले आहे. गरिबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांनी वेळेवर पैसे वितरित केल्याने त्यांना चांगलेच पुण्य लागणार आहे. अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून नेहमीच सर्वांना सोबत घेवून कामकाज केले. उमेद अभियान मधील ड्रोनची अवजार बँक असेल किंवा घरकुल मधील वाळूचे धोरण असेल यामध्ये त्यांनी अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे.

त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सुधीर ठोंबरे म्हणाले की, उमेद अभियानमध्ये जिल्हा नियोजन मधुन महिला बचत गटांच्या माध्यमातून मिनी शॉपिंग मॉल, मिलेट युनिट, कोल्ड स्टोरेज, ड्रोन अवजार बँक असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. तसेच घरकुल विभाग यामध्ये सर्वात जास्त उदिष्ट असताना पण सोलापूरचे काम चांगल्या पद्धतीने झाले. सर्व अधिकारी कर्मचारी यांचे पण यामध्ये योगदान आहे, असे सुधीर ठोंबरे म्हणाले. तसेच सर्वांनी कामकाजात केलेल्या सहकार्य बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, अमोल जाधव, प्रसाद मिरकले, शंकर कवितके, जस्मिन शेख, रतीलाल साळुंखे, सचिन चवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उमेद अभियान व घरकुल विभागाचे सर्व जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन दयानंद सरवळे यांनी तर आभार प्रदर्शन सूर्यकांत तोडकरी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button