सोलापूरजिल्हा परिषद

बापरे..! झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांच्या नावे फेक व्हाट्सअप अकाउंट

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्या नावे फेक व्हाट्सअप अकाउंट तयार करण्यात आले आहे. अशा बनावट व्हाट्सअप अकाउंटवरून येणाऱ्या मेसेजपासून सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सोलापुरात परिवार घेतल्यापासून प्रशासकीय कामकाजाला गती दिली आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती, कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळांपासून प्रलंबित राहिलेले अनेक प्रशासकीय प्रश्न सोडवले आहेत. नुकतीच आषाढी वारीत त्यांनी जोमाने काम करून मुख्यमंत्र्यांची प्रशंसा मिळवल आहे . त्यानंतर अनुकंपा भरती पारदर्शकपणे करून राज्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे नुकतेच प्रदीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांचा पदभार ही जंगम यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांचे वाढलेले लोकप्रियता पाहून हॅकर्सनी सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला त्यांचा फोटो वापरून फेक अकाउंट तयार केले आहे. या अकाउंट वरून जंगम यांच्या परिचयातील लोकांना मेसेज टाकून फसविण्याचा डाव हॅकर्समी टाकला आहे. याची माहिती मिळताच सीईओ जंगम यांनी आपल्या व्हाट्सअप क्रमांकावरून लोकांना सावध केले आहे. एक अकाउंट वरून करण्यात आलेले चॅटींग प्रसिद्ध करत संबंधित नंबरवरून येणाऱ्या मेसेज वरून सावध राहावे असे आवाहन केले आहे.

सायबर हॅकर्सनी यापूर्वी व्हाट्सअप, फेसबुक व मोबाईलवरील मेसेजच्या आधारे लोकांना बनावट मेसेज पाठवून चॅटिंग करून फसवले आहे. त्यामुळे असे बेनामी येणारे संदेश कॉल ची खात्री करूनच नागरिकांनी आपला व्यवहार ठेवावा असे सायबर ब्रांचतर्फे वारंवार आवाहन करण्यात येत आहे.

याच फेक अकाउंटवरून चॅटिंग…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button