जिल्हा परिषदमहाराष्ट्रराजकीयसोलापूर

पालकमंत्र्याकडे “ग्रामविकास’ असताना झेडपीची महत्त्वाची पदे रिक्तच

सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत रज खाते असतानाही सोलापूर जिल्हा परिषदेचे महत्त्वाचे पदे रिक्त असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे कामकाज पाहत आहेत. त्यांच्याकडे राज्यातील महत्त्वाचं ग्रामविकास खाते आहे. या खात्याअंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचा कारभार येतो. असे असताना सोलापूर जिल्हा परिषदेकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतील अनेक महत्त्वाची खाती रिक्त असल्यामुळे कामकाजावर त्याचा थेट परिणाम दिसून येत आहे. जिल्हा परिषदेतील लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता, बांधकाम कार्यकारी अभियंता दोन, दक्षिण सोलापूर पंचायत समिती बीडिओ, समग्र शिक्षण उप अभियंता, समाजकल्याण अधिकारी अशी महत्त्वाची पदे बऱ्याच दिवसापासून रिक्त आहेत. तसेच शिक्षण विभागाकडे अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे अनेक समस्या निर्माण होत असतानाही दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रश्नात लक्ष घालून जिल्हा परिषदेचा कारभार गतिमान करावा अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button