सोलापूरकृषीजिल्हा परिषद

आता अनुदानित रासायनिक खत विक्रीसाठी बायोमेट्रिक पॉश मशिन अनिवार्य

सोलापूर : डीबीटी प्रकल्पांतर्गत iFMS प्रणालीवर नोंदणीकृत अनुदानित रासायनिक खत विक्रेत्यांनी नवीन एल-1 बायोमेट्रिक पॉश मशिन बुधवार, दि. 20 ऑगस्टपर्यंत कार्यान्वित करणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

केंद्रिय खत विभागाच्या निर्देशानुसार, UIDAI च्या मानकांनुसार अधिक सुरक्षित एल-1 पॉश मशिनचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. विद्यमान Lo सुरक्षा प्रमाणपत्र असलेल्या फिंगरप्रिंट स्कॅनरच्या जागी एल-1 प्रमाणित मशिन वापरण्याचे आदेश मुख्य खत पुरवठादार व इतर कंपन्यांना देण्यात आले आहेत.  यानुसार कृषि आयुक्तालयाने जिल्हानिहाय विक्रेत्यांची यादी तयार करून उत्पादक कंपन्यांना एल-1 पॉश मशिन पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.

ज्या विक्रेत्यांनी अद्याप नवीन मशिन प्राप्त केलेली नाही, त्यांनी ती तात्काळ घेऊन 20 ऑगस्टपूर्वी कार्यान्वित करावी. अन्यथा, जुनी लो पॉश मशिन वापरणाऱ्या विक्रेत्यांना खत खरेदी करता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

मशिन मोफत उपलब्ध  

नवीन एल-1 PoS मशिन खत कंपन्यांकडून मोफत दिली जाणार असून, अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी अधिकारी हावळे यांनी केले आहे.

तर होणार कारवाई…  

खत विक्रीची नोंद iFMS प्रणालीमध्ये रिअल टाइममध्ये होणे आवश्यक असून, ई-पॉसवरील साठा व प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत आढळल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button