सोलापूरमहापालिका

सोलापूर महापालिकेने थकीत टॅक्ससाठी जाहीर केली व्याज,दंड माफीची योजना

सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्येक्षखाली 16 ऑगस्ट रोजी महापालिका येथे  घेतलेला बैठकीत कर वसुली होण्यासाठी मालमत्ता कराबाबत सूट देण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

दि. २१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत विशेष मालमत्ता कर विभागाच्यावतीने अभय योजना राबविण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गत सर्व थकबाकीदार नागरिकांना त्यांच्या मालमत्ता करासोबत असलेल्या व्याज व दंड शुल्कामध्ये १००% सूट देण्यात येणार आहे. म्हणजेच केवळ मूळ कराची रक्कम भरल्यास व्याज व दंड पूर्णपणे माफ करण्यात येईल.महापालिकेच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,आपल्या मालमत्ता कराची थकबाकी या विशेष योजनेत तातडीने जमा करावी.आपल्या वेळेवर भरलेल्या करामुळे शहरातील विकासकामांना चालना मिळणार आहे.

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी सांगितले की, “नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत मालमत्ता कर थकबाकी तातडीने भरावी व वेळेत कर भरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कर वसुलीतून जमा होणाऱ्या निधीतूनच शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता व विकासकामे होत असतात. त्यामुळे या विशेष योजनेला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा.अहवान आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले. सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व कर संकलन केंद्रांवर तसेच फोनपे, पेटीएम, ऑनलाइन प्रणालीद्वारेही कर भरता येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button