सोलापूरआरोग्यजिल्हा परिषद

सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ.वर्षा डोईफोडे यांनी घेतला पदभार

सोलापूर : सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. वर्षा नामदेव डोईफोडे यांनी पदभार घेतला आहे. या पदावर पहिल्यांदाच एका महिला डॉक्टराला मान मिळाला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक सुहास माने यांची ठाण्याचे आरोग्य उपसंचालक म्हणून बदली झाली आहे. त्यांच्याजागी जुन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. वर्षा डोईफोडे यांची सार्वजनिक आरोग्य विभागाने 10 सप्टेंबर रोजी नियुक्ती केली आहे. डॉ. माने यांच्याकडून त्यांनी नुकताच पदभार घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पहिल्यांदाच महिला डॉक्टरांना मान मिळाला आहे. डॉ. डोईफोडे या मूळच्या अहिल्यानगरच्या असून पुण्यात त्यांचे वास्तव्य आहे. त्या स्वतः सर्जन असून त्यांचे शिक्षण एमबीबीएस व एम. एस. इएनटी मध्ये झाले आहे. जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचा कारभार त्यांच्या देखरेखीखाली आला आहे. त्यामुळे या नव्या रुग्णालयात आणखी सोयीसुविधा वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button