February 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

कोरोनात वेळेवर लस पोचविणारे फार्मासिस्ट प्रवीण सोळंकी सेवानिवृत्त

सोलापूर : कोरोना महामारीच्यावेळेस लस वेळेत पोचवून रुग्णांचा आशीर्वाद घेणारे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे फार्मसिस्ट प्रवीण सोळंकी हे 31 डिसेंबर रोजी 32 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात जिल्हा औषध भंडारात कार्यरत असलेले प्रवीण बाबूलाल सोळंके हे 32 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले. पुण्यातील भारती विद्यापीठ मध्ये फार्मसीसची पदवी घेतल्यानंतर जानेवारी 94 मध्ये ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात फार्मासिस् म्हणून सेवेत रुजू झाले. पहिल्यांदा मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर कोंडी औराद येथे त्यांनी सेवा बजावली. त्यानंतर जिल्हा औषध भंडाराची बरीच वर्षे जबाबदारी सांभाळली. आरोग्य केंद्रात कार्यरत असताना रुग्णाला वेळेत औषध पोहोचवण्यासाठी अनेकदा त्यांचा अपघात झाला. पण रुग्णांच्या आशीर्वादामुळे ते यातून सुखरूप बाहेर पडले. जिल्हा औषध भंडारात कार्यरत असताना कोरोना महामारी आली. या काळात त्यांनी जीवाची परवा न करता सेवा देऊन रुग्णांना वेळेत औषधे पोचविण्यासाठी अहोरात्र काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये त्यांचा सन्मान केला.

या काळात त्यांना अनेक संस्थांची पुरस्कार मिळाले. आरोग्य सेवेबरोबर त्यांनी कुटुंबाकडेही लक्ष दिले. त्यांच्या पत्नी प्रवीण सोळंकी या भारतीय जैन महिला संघटनेच्या अध्यक्षपदाच्या धुरा सांभाळत आहेत. समाजसेवेबरोबरच त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. मोठा मुलगा डॉक्टर दीपक हा पुण्यात हाडाचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची सून डॉक्टर नेहा या त्यांना साथ देत आहेत. छोटा मुलगा मनीष हा इंजिनियर असून बारा वर्षांपसून अमेरिकेत सरकारी प्रोजेक्टवर काम करीत आहे. फार्मासिस्ट प्रवीण सोळंकी यांच्या निवृत्तीबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले व मित्र परिवारांनी अभिनंदन करत आगामी वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.