सोलापूरजिल्हा परिषदसंघटना-संस्था

ल्योकाच्या हाफिसमध्ये फेटा बांधून सन्मान केल्याने “या’ माता गहिंवरल्या

सोलापूर: आपल्या ल्योकाच्या ऑफिसमध्ये बोलावून फेटा बांधून सन्मान करण्यात आल्याने अधिकाऱ्यांच्या मातांना गहिवरून आले. राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेत मराठा सेवा संघ शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमातील हा प्रसंग त्या मातांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनाही सर्व मातांच्या डोळ्यातील हा आनंद पाहून आपल्या आईची आठवण झाली.

मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्यावतीने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी कुलदीप जंगम यांचेहस्ते व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, शिक्षणाधिकारी कादर शेख, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, संतोष कुलकर्णी, एच. सी सपताळे गटविकास अधिकारी मनोज राऊत,विवेक जमदाडे, रघुनाथ पांढरे, उमेश कुलकर्णी,जस्मीन शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष उपस्थितीत जिल्हा परिषदेत खाते प्रमुख व गट विकास अधिकारी यांच्या आईचा “कर्तृत्ववान महिला’ म्हणून सन्मान करण्यांत आला. तसेच यावेळी जिल्हा परिषदेतील सर्व जिजाऊ, सावित्रीच्या लेकींचा मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.

प्रारंभी जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पुजन करून अभिवादन करण्यात आले. जिजाऊ वंदना अश्विनी भोसले यांनी तर महाराष्ट्र गीत मोहंमद अयाज यांनी गायले. यावेळी उषा उत्तमराव जगताप, छाया महादेव पाटील, वनमाला महादेव भुजबळ, माया चंद्रहार जाधव, मंगला यशवंत मिरकले, कल्पना तानाजी वाकडे, सुदामती नागनाथ जगताप, प्रभावती गोविंद नवले, नंदाबाई शिवाजी हावळे, कलावती भरत धनशेट्टी,बायडाबाई सुभाष कवितके, सविता तानाजी कदम, वनिता विजय जमदाडे,चंद्रभागा भगवान पांढरे, कुसूम जनार्दन कुलकर्णी,लियाकत नैनुद्दीन शेख, सुनिता बापूराव राऊत यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या लेकाच्या ऑफिसमध्ये या माता पहिल्यांदाच आल्या. सोलापूर जिल्हा परिषदेची इमारत, भव्य सभागृह आणि आपला मुलगा काम करीत असलेले कार्यालय पाहून या मातांचा उर भरून आला. आपले सहकारी अधिकाऱ्यांच्या माता कार्यक्रमाला जमलेल्या पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना आपल्या आईची आठवण झाली. माझी आई शिक्षिकेची नोकरी करते. नोकरीसाठी दररोज तिला शंभर किलोमीटर प्रवास करावा लागतो. आमच्या शिक्षणासाठी तिने केलेले कष्ट आज मला आठवतात, अशा शब्दात त्यांनी आईची आठवण सांगितली.

66 जणांनी केले रक्तदान

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृहात दिवसभर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी अशा 66 रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान केले. कार्यकमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाच्या जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी केले. यावेळी शिक्षक संघटनेचे नेते अनिरुद्ध पवार,निलेश देशमुख,राम शिंदे,सुनिल चव्हाण, शामराव पाटील व कर्मचारी संघटनेचे नेते अरूण क्षीरसागर, राजेश देशपांडे, दिनेश बनसोडे, संतोष जाधव यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन साळुंखे, सुर्यकांत मोहिते, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन जाधव, सचिन चव्हाण, चेतन भोसले, आनंद साठे, विकास भांगे, रणजित गव्हाणे, संतोष शिंदे, अनिल पाटील, वासुदेव घाडगे, सुधाकर माने- देशमुख, विशाल घोगरे, अभिजीत निचळ, संतोष सातपुते, संतोष शिंदे, भूषण काळे, उमेश खंडागळे, प्रकाश शेंडगे, मनोज साठे, गोपाल शिंदे, संजय पाटील, रविंद्र शेंडगे, महेंद्र माने, सुभाष तनमोर, शशि साळुंखे, विठ्ठल मलपे, संतोष शेळके, नितिन पाटील, दिपक वाघमारे, कुंडलिक खुर्द यांनी प्रयत्न केले.

शासकीय काम करताना माझा अनेक ठिकाणी सन्मान झाला आहे. पण मी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी माझ्या आईला बोलावून सन्मान करण्यात आला. माझ्या कामाच्या ठिकाणी आईचा असा सन्मान होणे हे तिच्यासाठी पहिल्यांदाच घडले आहे. यानिमित्ताने तिला माझे कार्यालय पाहायला मिळाले, तिच्या चेहऱ्यावरील आनंदाने मलाही अभिमान वाटला.

अमोल जाधव, 

प्रकल्प संचालक, जलजीवन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button