पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियाई संकटाच्या पाश्वभुमीवर केलेल्या अहवानाला प्रतिसाद देत सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाने आपला सर्वच कारभार ऑनलाईन केला आहे. त्यामुळे यापुढे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माध्यमिक शिक्षण कार्यालयात येण्याचे गरज नाही. अत्यंत गरजेच्या कामासाठी संबंधित तालुक्यातील गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे शिक्षकांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरीकांना आवाहन केले आहे. ज्यामध्ये घरून काम करण्याची मुभा अनावश्यक, सोने खरेदी टाळणे, पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करणे. खादयतेलाचा वापर कमी करणे रासायनिक खतावरील अवलंबिता कमी करुन नैसर्गिक शेती करणे स्वदेशी उत्पादनाचा वापर वाढविणे व परदेश दौरे टाळणे इ. बाबीचा समावेश आहे. उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास सुचित करण्यात येते कि, संदर्भीय शासन निर्णयानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्या कार्यालयाने खालील पध्दतीने कामकाज करण्याचे निश्चित केले आहे.
या कार्यालयात शिक्षक व पालक, विदयार्थी व सर्वसाधारण नागरिक यांनी आपल्या कोणत्याही कामासाठी कार्यालयात येण्याची आवश्यता नाही. या कार्यालयाचा ई मेल eosecsol२०२१@gmail.com या मेल आयडीवर तसेच विठठल ढेपे-उपशिक्षणाधिकारी: माळशिरस, पंढरपूर, करमाळा, उ. सोलापूर सुरेश वाघमारे उपशिक्षणाधिकारी: अक्कलकोट, बार्शी, प्रकाश नांगरे उपशिक्षणाधिकारी : मंगळवेढा,द. सोलापूर, मोहोळ, माढा यांचा उपरोक्त भ्रमणध्वनीवर Whatsapp व्दारे आपले प्रस्ताव सादर करावेत.या कार्यालयात अनेक तक्रारोच्या अनुषंगाने सुनावण्या आयोजित केल्या जातात यापुढे या सुनावण्या दर मंगळवारी ऑनलाईन प्रणालीद्वारे घेण्यात येतील यामध्ये अभ्यागतांनी आपले म्हणणे ई मेलवर सादर करावे व दिलेल्या लिंक वर join व्हावे. शासन निर्णय दिंनाक २९.०४.२०२२ नुसार शिक्षक संवाद दिन आयोजित करणे बाबत सुचित केले आहे. दर महिन्याच्या दुत्तऱ्या व चौथ्या गुरुवारी हा शिक्षक संवाद ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येईल अभ्यागतांनी आपले प्रस्ताव व तक्रारी दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यालयाच्या ई मेलवर सादर कराव्यात व दिलेल्या लिंकवर ऑनलाईन Join व्हावे. उपरोक्त प्रमाणे सर्व अभ्यागंताना सुचित करण्यात येते कि, या कार्यालयामध्ये आपल्या कोणत्याही कामासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. खरे तर कामासाठी शिक्षकांना कार्यालयात येण्याची गरज नव्हती. संस्थेचे मुख्याध्यापक व संबंधित क्लार्क यांनाच यापूर्वी प्रवेश होता. पण शिक्षक विनाकारण कार्यालयात गर्दी करताना दिसून येत होते. आता या शिक्षकांना आपल्या कामासाठी माध्यमिक शिक्षण कार्यालयात येण्याची गरज नाही. इंधन बचतीच् दृष्टीने संबंधित शिक्षकाने दिलेल्या मेलवर, व्हाट्सअप क्रमांकावर किंवा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे आपले अर्ज द्यावेत असे आवाहन शिक्षणाधिकारी जगताप यांनी केले आहे.



