सोलापूरजिल्हा परिषद

झेडपीच्या महिला बालकल्याण सभापतीपदी अमृता वाघे, समाजकल्याण सातपुते यांच्याकडे

सोलापूर ; सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक पार पडत असून समाज कल्याण सभापती पदासाठी संस्कृती सातपुते, महिला बालकल्याण साठी अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतीसाठी रामाप्पा चिवडशेट्टी तर अर्थ बांधकाम समिती सभापती पदासाठी चेतनसिंह केदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक शुक्रवारी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडणार आहे. तत्पूर्वी हॉटेल बालाजी सरोवर येथे सर्व भाजप जिल्हा परिषद सदस्यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर विषय समिती सभापती पदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यानुसार रामाप्पा चिवडशेट्टी, केदार सिंह सावंत यांनी सर्वसाधारण सभापती पदासाठी तर समाजकल्याण सभापती पदासाठी संस्कृती सातपुते, महिला व बालकल्याण सभापती पदासाठी अमृता वाघे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता दुपारी या अर्जाची छाननी होऊन निवड जाहीर करण्यात येणार आहे. या उमेदवारा विरोधात कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चिवडशेट्टी व सावंत यांना कोणते खाते मिळणार हे अद्याप निश्चित नाही. अर्थ व बांधकाम खाते उपाध्यक्ष यांच्याकडे आहे. त्यामुळे शिक्षण व आरोग्य आणि कृषी ही दोन खाती रिकामी आहेत. चिवडशेट्टी यांना कृषी तर सावंत यांना शिक्षण व आरोग्य सभापतीपद मिळू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button