सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

शिक्षणाधिकारी जगताप यांनी दिला स्कॉलर मुलाला धक्का; परीक्षेच्या आदल्या दिवशीच मिळाली एन्ट्री

सोलापूर :  स्काॅलरशिप परीक्षेच्या आदल्या दिवशी एका स्कॉलर मुलाला समजते आपला फाॅर्मच भरला गेलेला नाही. त्या स्कॉलर मुलासह शिक्षक टेन्शनमध्ये असताना सहज चाचपणी म्हणून त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना फोन केला अन माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी प्रयत्न करून त्या स्कॉलर मुलाला स्कॉलरशिप परीक्षेसाठी एन्ट्री मिळवून दिली आहे.

संदेश महादेव कापसे या स्काॅलर विद्यार्थ्यांच्याबाबतीत शनिवारी हा किस्सा घडला. स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीसाठी तो कोल्हापूरला होता. गावातीलच शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे परीक्षेसाठी तो गावी दाखल झाला. त्याला आई नाही व वडील कामानिमित्त बाहेर असतात. तरीही शिकून मोठे होण्यासाठी शिक्षकांच्या सहकार्याने त्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू होता. रविवारच्या परीक्षेसाठी  एक दिवस आधी तो गावी आल्यानंतर त्याला आपल्या परीक्षेचा फॉर्मच भरला नाही असे समजले. त्यामुळे तो निराश होऊन एका कोपऱ्यात जाऊन बसला.

त्याच्या शिक्षकांना हा सर्व विषय समजल्यानंतर काही प्रयत्न करता येतील का म्हणून तालुक्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी 99.99% नाही असे उत्तर दिले. त्याचबरोबर शिक्षणाधिकारी जगताप यांना फोन करा तेच काही मार्ग काढतील असा सल्लाही दिला.शेवटचा प्रयत्न म्हणून त्या शिक्षकानी शिक्षणाधिकारी जगताप यांना फोन लावला व सर्व प्रकार सांगितला, शिक्षणाधिकारी जगताप यांनी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकून घेतले. मी पुण्याला फोन लावून विचारतो, जर होत असेल तर तुम्हाला 8 वाजता फोन करतो.आनंदाची गोष्ट म्हणजे खरंच बरोबर 8 वाजता शिक्षणाधिकारी जगताप यांचा त्यांना फोन गेला. त्यांनी सांगितले की सुपर लेट फीने फाॅर्म भरून घ्या आणि उद्या त्याला परीक्षेसाठी पाठवा व माझ्या शुभेच्छा सांगा. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एका प्रामाणिक, गरजवंत विद्यार्थ्यांला न्याय मिळवून  दिल्याबद्दल त्या शिक्षकांनी शिक्षण अधिकारी जगताप यांचे आभार मानले. शिक्षण विभागात घडलेल्या या आकस्मित घटनेने इतर शिक्षकांनाही हे असे होऊ शकते, असा विश्वास निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button