सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

दिव्यांग शाळांचे प्रश्न सोडवण्याची सोलापुरातील संस्थापकांची मागणी

सोलापूर : दिव्यांग शाळांचे नियमानुसार प्रश्न सोडवण्याची मागणी सोलापुरातील संस्थापकाने जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांकडे केली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाची निर्मिती झाल्यापासून चार महिन्यात तीन अधिकारी बदलले आहेत. जिल्ह्यात 52 दिव्यांग शाळा आहेत. या शाळांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिन्यानंतर झाले आहे. दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्याकडे देण्यात आला आहे. अतिरिक्त पदभार स्वीकारल्यानंतर भुजबळ यांनी पहिल्या मजल्यावर असलेले दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय तळमजल्यावर सुरू करण्यासाठी दक्षिण सोलापूर पंचायत समिती मधील जुन्या इमारतीमधील मोकळ्या जागेची शुक्रवारी पाहणी केली. दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे कामकाज नव्या इमारतीत हलविण्यात येत असल्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व योजना शिक्षण विभागाचे कार्यालय या इमारतीत हलविण्यात येणार आहे.

जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांचे दिव्यांग शाळांच्या संस्थापकानी भेट घेतली. शाळांचे अडलेले अनुदान, परवाना नूतनीकरण व इतर नियमानुकूल कामे मार्गी लावावीत अशी विनंती जिव्हाळा मतिमंद शाळेचे अण्णासाहेब राजमाने यांनी केली. याप्रसंगी समीर तडवळकर, अरुण धोत्रे, चित्रसेन पाथरूड, स्वप्नाली चिट्टे, काळे, राठोड आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button