जिल्हा परिषद

दक्षिण पंचायतीचे मनोज राऊत ठरले उपक्रमशील बीडीओ

सोलापूर : उपक्रमशील बेस्ट बीडीओ म्हणून दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचा सभापती संदीप टेळे यांनी सन्मान केला.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीची नुकतीच मासिक सभा झाली. या सभेत सभापती संदीप टेळे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीने गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी राबविलेल्या उपक्रमाची दखल घेतली. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी पदभार घेतल्यापासून जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना व लोकशाहीची समज विकसित करण्यासाठी प्रतिकात्मक सरपंच हा उपक्रम घेतला. राज्य पातळीवर या उपक्रमाची चर्चा झाली. त्यानंतर फाईव्ह स्टार शाळा हा उपक्रम हाती घेतला आहे. शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या प्रयोगातून शाळेचे व्यवस्थापन व शाळांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्मिती झाली आहे. गटविकास अधिकारी राऊत यांनी हाती घेतलेल्या या अभिनव व प्रेरणादायी उपक्रमाची दखल घेत पंचायत समितीच्या मासिक सभेत त्यांच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आला व त्यानंतर सर्व सदस्य व सभापतींनी त्यांचा सन्मान केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button