सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप ठरले ‘बेस्ट ऑफिसर”

सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचा मंगळवारी त्यांच्या कार्यालयात ‘बेस्ट एज्युकेशन ऑफिसर” ठरल्याबद्दल सन्मान करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष माने व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचा सन्मान केला. याप्रसंगी कार्यालयीन कर्मचारी अनिल पाटील, धोत्रे, कोरे उपस्थित होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल ‘नवराष्ट्र” ग्रुपतर्फे ‘बेस्ट एज्युकेशन ऑफिसर”  हा पुरस्कार देऊन नुकताच गौरव करण्यात आला. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे तंत्र शिक्षण मंत्री आशिष पटेल यांच्याहस्ते जगताप यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून स्वागत होत आहे. त्यामुळेच माध्यमिक शिक्षण कार्यालयात त्यांचे फेटा व पुष्पहार घालून पुस्तक भेट देऊन कौतुक करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button