सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपीत पुन्हा सुरू होणार वाचनालय

सोलापूर : जिल्हा परिषदेत बंद असलेले वाचनालय नव्या स्वरूपात पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. कास्ट्राईब संघटनेच्या पाठपुराव्याला यश आल्याबद्दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांनी सीईओचे आभार मानले आहेत.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या बाजूलाच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सुरू करण्यात आले होते. समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीत असलेले हे वाचनालय गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहे. वाचनालयातील पुस्तके धुळखात पडून आहेत. जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटनेने पहिल्यांदा या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. कास्ट्राईब संघटनेचे जिल्हा अरुण शिरसागर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला 10 मागण्यांच्या पूर्ततेबाबत पत्र दिले होते. त्यामध्ये बंद असलेले हे वाचनालय सुरू करण्याबाबत लक्ष वेधले होते. याबाबत माहिती देताना क्षीरसागर म्हणाले की जिल्हा परिषदेमधील मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांनी 3 मार्च 2018 रोजी सर्व जिल्हा परिषदांना परिपत्रक दिले आहे. या परिपत्रकानुसार मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा शर्ती सेवा भरती पदोन्नत्या बदल्या गोपनीय अहवाल यासारख्या संवेदनशील अडीअडचणीच्या प्रश्नाबाबत मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनासोबत बैठका घेऊन त्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवर निकाली काढावेत अशा सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी 9 जानेवारी 2025 रोजी संघटनेसोबत बैठक घेतली आहे त्याला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार संघटनेने 19 एप्रिल 2025 रोजी संघटनेने प्रशासनाकडे दहा मुद्दे मांडले होते. यातील मुद्दे निकालीत काढल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने कळविले होते. पण त्यातील अनेक मुद्दे अद्याप निकाली झालेले नाहीत. त्यात जिल्हा परिषदेत एटीएम सुरू करावे, गुणवंत कर्मचारी पुरस्कार सुरू करावा व तो महाराष्ट्र देणे देण्यात यावा, दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेत असलेले स्वच्छतागृह सुरू करण्यात यावे. परंतु जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे या मागण्याकडे लक्ष दिले नव्हते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे संवेदनशील आहेत. त्यांनी या प्रश्नांची दखल घेतली असून आता वाचनालय सुरू करण्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्य असल्याचे क्षीरसागर यांनी नमूद केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी गेल्या वर्षभरात अनुकंपा भरती, पदोन्नत्या, सर्व संवर्ग कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेचा लाभ सरळ सेवा भरती ही कामे अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली आहेत. सीईओ जंगम यांनी यात स्वतः लक्ष घालून कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे. त्याबद्दल जिल्हा परिषद कर्मचारी कास्ट्राईब संघटना सीईओ जंगम यांचे आभार मानत आहे.

जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनांची रंगरंगोटी झाली आहे. आता वाचनालयाची रंगरंगोटी करून कपाट व पुस्तकांची पुनर्रचना केली जाईल. त्यानंतर वाचनालयात चांगल्या सुविधा देऊन पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हे वाचनालय खुले केले जाईल असे सीईओ जंगम यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button