सोलापूरआरोग्यजिल्हाधिकारी कार्यालय

28 जून रोजी देणार चार लाख 37 हजार बालकांना पोलिओ डोस

सोलापूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जिल्हा समन्वय समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी गणेश निराळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 28 जून रोजी जिल्ह्यातील चार लाख 37 हजार बालकांना एकाच वेळी पोलिओ डोस देण्याचे यावेळी नियोजन करण्यात आले.

बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी मोहिमे बाबत माहिती दिली. दि.२८ जून रोजी रविवारी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली आहे. सोलापूर जिल्हयात एकूण ४ ,३६ ,५७२ इतके ५ वर्षाच्या आतील बालके असून त्यासाठी ग्रामीण भागात ५५७०, शहरी भागात ५७० व महानगरपालिका भागात ३७३ लसीकरण बुथची सोय करण्यात आलेली आहे. लसीची मात्रा देण्यासाठी ७२२२ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले असून पर्यवेक्षणासाठी वैद्यकिय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, तालुकास्तरीय पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
यामध्ये मोहिमेबाबत माहिती देताना डॉ. नंदीकिशोर घाडगे अति जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगीतले की, बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, बाजार, विटभटटया, साखर कारखाने, यात्रा, लग्न समारंभ या ठिकाणी पोलिओ डोस पाजण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भटक्या वसाहती व उसतोड कामगारांच्या वसाहतीतील बालकांना लस पाजण्यासाठी मोबाईल टिमची सोय करण्यात आलेली आहे.
यामध्ये मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी निराळी यांनी सांगीतले की, मोहिमेच्या कालावधीत ०-५ वयोगटातील एकही लाभार्थी पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्याची व मोहिम यशस्वी करावी असे सभागृहास मार्गदर्शन करताना सांगीतले.
कोल्ड चेन समतोल, वाहनांची सोय, जनजागृती प्रचार व प्रसिद्धी तसेच लोकांचा सहभाग यावर भर दिला या समितीमधील इतर सदस्य यांना समन्वय साधण्यास सांगितले. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी ५ वर्षाच्या आतील सर्व बालकांना पोलिओ लस पाजून घेण्यात यावे व ग्रामस्तरावर शालेय विद्याथ्यांच्या प्रभात फेरी काढण्यात येवून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत माहिती देण्यात यावी, असे आवाहन केले आहे. या समितीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नंदकिशोर घाडगे, आरोग्य अधिकारी (मनपा) डॉ राखी माने, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ मंजिरी कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी हेमंत पवार, जिल्हा आरोग्य अधिपरिचारिका सपना सोनवणे व साधना शिरसाट, वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ ओमकार येमुल, सहाय्यक प्रोफेसर डॉ तिरुपती चोरमले व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button