सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन साजरा

सोलापूर : जिल्हा परिषदत महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन जिल्हा परिषद चे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, महिला बालकल्याण समितीच्या सभापती अॅड. अमृता वाघे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण जिल्हा परिषदचे अध्यक्ष दीपक वैद्य यांचेहस्ते करून मानवंदना देणेत आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी उबाळे, यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी महाराष्ट्र गीत घेण्यात आले. ध्वजारोहण करून राष्ट्रगीत घेणेत आले. हरिभाऊ देवकरण प्रशालेते विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत सादर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button