May 1, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

गड संवर्धनासाठी जाणाऱ्या मावळे व खासदार लंके यांचा सन्मान

सोलापूर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खासदार नीलेश लंके व गड संवर्धनाचे मावळे सोलापूर जिल्ह्यातून दक्षिणेतील छत्रपतींच्या तात्पुरत्या राजधानी जिंजी किल्ला तामिळनाडू येथे जात आहेत.  गड संवर्धनासाठी जाणाऱ्या मावळे व खासदार लंके यांच्या सोलापूर जिल्ह्यात आगमनप्रित्यार्थ सत्कार करण्यात आला.

यावेळी जीशान शेख मित्र परिवार व बालभारती विद्यालय सोलापूर यांच्याकडून तीनशे मावळ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. शिवरायांचे गड – आपली जबाबदारी या मोहिमेत किल्ले संवर्धनाचा हा  उपक्रम खासदार डॉ निलेश लंके यांच्या संकल्पनेतून आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यातून एक गड किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहिमेच्या माध्यमातून वृक्षारोपण केले जात आहे. एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सदरच्या 14 व्या स्वच्छता मोहिमेला जाताना खासदार व गड संवर्धनाचे मावळे सोलापूर जिल्ह्यातून दक्षिणेतील छत्रपतींच्या तात्पुरत्या राजधानी जिंजी किल्ला तामिळनाडू येथे जाणाऱ्या मावळ्यांचाही सत्कार व खासदार लंके यांचा सोलापूर जिल्ह्यात आगमनप्रित्यार्थ सत्कार करण्यात आला. जिशान शेख, मुस्ताक शेख, इलियास शेख, जहीर शेख यांच्याहस्ते  खासदार लंके व मावळा संघटनेचे अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी बालभारती शिक्षण संकुलनाचे संस्थापक सचिव  हाजी शब्बीर भाई शेख व संस्थेचे अध्यक्ष इमरान शेख व बालभारती विद्यालयाचे मुख्याध्यापक रिजवान शेख यांच्याकडूनही खासदारांचा सत्कार करण्यात आला. मावळा संघटनेच्या या उपक्रमास सोलापूरच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या