सोलापूरजिल्हा परिषद

झेडपीच्या दिव्यांग क्रीडा स्पर्धेला जोरदार प्रतिसाद

सोलापूर : जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला सोलापुरातील नेहरूनगर येथील श्री शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील एक हजार दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले आहेत,  अशी माहिती समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिली.

दोन दिवस चालणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 51 दिव्यांग शाळांमधील मतिमंद,कर्णबधीर, मुकबधीर,
अस्थिव्यंग व अंध प्रवर्गातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनीषा वाकडे यांच्याहस्ते झाले.लातूर येथील समाज कल्याण समितीचे सभापती रोहिदास वाघमारे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर, नॅब संस्थेचे सचिव शशीभूषण यलगुलवार, संत दामाजी अपंग शिक्षण मंडळाचे सचिव चित्रसेन पाथरुट, समाज कल्याण विभागाचे कार्यालय अधीक्षक विलास शिंगाडे, शशी ढेकळे उपस्थित होते.
या दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये 25 मीटर धावणे, 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, व 400 मीटर धावणे व 4×100 रिले,
गोळाफेक, लांब उडी,उभे राहून उडी मारणे अंधासाठी बुद्धिबळ, पासिंग द बॉल ,अस्थिव्यंग प्रवर्गासाठी व्हीलचेअर रेस 25 मीटर धावणे, व्हीलचेअर वर बसून गोळा फेक, बादलीत बॉल टाकणे,25 मीटर चालणे इत्यादी क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा दिवसभर सुरू होत्या.
नागपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेते एन.के.अहमद,बाली चामना दोघेही मुक्ताई मतिमंद मुलांचे बालगृह, लवंगी ,सचिन काळे व महादेव काळे (दोघेही मतिमंद शाळा अगळगाव) या चारही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

दत्ता मोकाशी, कमलाकर तिकटे यांनी सूत्रसंचालन संचालन केले. रोहन भालेराव व रामदास कुंडगीरे या विशेष शिक्षकांनी सांकेतिक भाषेत मुकबधीर व कर्णबधिर विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे समालोचन केले.रेडक्राॅस बधीरमुक विद्यालय बार्शी या शाळेतील विद्यार्थी करण चोरमुले याने खेळाडूंना शपथ दिली.
आज सांस्कृतिक कार्यक्रमात कला दर्शन
मंगळवार दिनांक 6 रोजी सकाळी अकरा वाजता सोलापुरातील छत्रपती रंगभवन सांस्कृतिक सभागृहात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये लोकगीत, भक्ती गीत,देशभक्तीपर गीत, व पोवाडा, नाटिका आदी कलाविष्कार दिव्यांग विद्यार्थी कलाकार सादर करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button