सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

समाजकल्याण अधिकारी सोनवणे, शिक्षण अधिकारी शेख यांनी दिला मुख्याध्यापिकेला न्याय

सोलापूर : टेन्शनमध्ये जिल्हा परिषदेत चक्कर येऊन पडलेल्या मुख्याध्यापिकेला जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे व प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी न्याय दिला आहे.

टेंभुर्णी येथील मूकबधिर निवासी मुख्याध्यापिका शैलजा पाटील या शाळेच्या कामकाजासाठी पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत आल्यावर रक्तदाब वाढून चक्कर येऊन पडल्या होत्या. त्यांची समस्या ऐकून घेऊन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे व प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी न्याय दिला आहे.श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्थेमार्फत सांगोला तालुक्यातील तिप्पेहळळी येथे निवासी मूक बधिर शाळा कार्यरत होती. जनजागृती प्रबोधन मंच संचलित ही मूकबधिर निवासी शाळा टेंभुर्णी येथे स्थलांतरित करण्यात आली आहे. याला दिव्यांग कल्याण आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. असे असताना काही स्वयंघषित अध्यक्ष व शिक्षकांनी ही शाळा सांगोला येथेच असल्याचे भासविले आहे. शाळा स्थलांतरित झाल्यानंतर 29 जुलै 2024 पासून पाच शिक्षक गैरहजर राहिल्याने त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. असे असताना त्यातील एका स्वयंघोषित मुख्याध्यापकाने न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून प्राथमिक शिक्षण विभाग व समाजकल्याण विभागाची दिशाभूल करण्याचे काम सुरू केले होते. त्यामुळे या शाळेच्या यु-डायस व इतर शिक्षकांच्या पगारासाठी अडचण निर्माण झाली होती. पगार नसल्याने अडचण निर्माण झाल्यानंतर मुख्याध्यापिका पाटील यांचा रक्तदाब वाढला व त्यांना चक्कर आली होती. त्यांच्याकडील असलेले पुरावे व कागदपत्रे तपासून समाजकल्याण अधिकारी सोनवणे व प्राथमिक शिक्षणाधिकारी शेख यांनी त्यांना न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग आयुक्तांनीही संबंधित मुख्याध्यापिकेसह कामावर हजर असणाऱ्या शिक्षकांचा पगार देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार समाजकल्याण विभागाने कार्यवाही केली आहे. तर कोणताही आदेश नसताना प्राथमिक शिक्षण विभागात येऊन तक्रार करणाऱ्या त्या स्वयंघोषीत शिक्षकांना शिक्षणाधिकारी शेख यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. संबंधित मुख्याध्यापिकेला न्याय देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, समाजकल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांच्यासह कक्षाधिकारी सोनकांबळे, लिपिक मळगे  व प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यासह विस्ताराधिकारी स्वामी, लिपिक सुतार यांनी मोलाची कामगिरी बजावली.

शाळेने प्रसिद्ध केलेली जाहीर नोटीस…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button