सोलापूर

जागतिक शौचालय दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यात स्वच्छता मोहीम

गावे पूर्ण हागणदारी मुक्त करण्यासाठी झेडपी प्रशासनाची मोहीम

सोलापूर : रविवार दि. १९ नोव्हेबर रोजी जागतिक शौचालय दिन आहे. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत राज्यातील गावे हागणदारीमुक्त अधिक होण्यासाठी व वैयक्तिक शौचालयाचा वापराबाबत जिल्‍हयात स्‍वच्‍छता उपक्रम राबवावा असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण कक्षाने केले आहे.

संपूर्ण ग्रामीण स्वच्छता शाश्‍वत स्वरूपात टिकविण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत ग्रामीण भागातील सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैलागाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अशाप्रकारे कामे पूर्ण करून गावे हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित केली जात आहेत. या औचित्‍याने रविवार दिनांक 19 नोव्‍हेंबर रोजी जिल्‍हयात सर्व गावातून स्‍वच्‍छता उपक्रम राबविण्‍यात येणार आहे.

ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांकडे शौचालय नाही अशा कुटुंबांना शौचालय देण्यासाठी केंद्र शासनाने ऑनलाइनद्वारे वैयक्तिक शौचालय मागणीची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. याची माहिती ग्रामस्थांना देवून नावे ऑनलाईन करणे व शौचालय बांधकाम करणे, यापूर्वी ज्यांनी एक खड्डयाचे शौचालय बांधलेले आहे अशा कुटूंबांना दुसऱ्या खड्ड्यांचे बांधकाम करावयास लावणे. जेणेकरून हे शौचालय त्यांना नियमित वापरता येईल. सार्वजनिक शौचालय बांधकाम व सार्वजनिक शौचालयाची स्‍वच्‍छता तसेच सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्‍थापनाची कामे करुन गाव शाश्‍वत स्‍वच्‍छ ठेवणे आदी उपक्रम गावपातळीवर राबवावेत. सदर उपक्रमासंदर्भात गट विकास अधिकारी यांना सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. जागतिक शौचालय दिनानिमित्‍त स्‍वच्‍छतेचे उपक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी नागरीकांनी मोठया प्रमाणात सहभाग घेवून गावे शाश्‍वत स्‍वच्‍छ करावीत असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे , अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे व जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशनचे प्रकल्‍प संचालक तथा उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे.
जिल्हा पाणी व स्वच्छचा कक्षातील लेखाधिकारी श्रींकांत मिरगाळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , अधिक्षक सचिन सोनकांबळे, प्रशिक्षण समन्वयक शंकर बंडगर , संवाद सल्लागार सचिन सोनवणे, सांडपाणी सल्लागार प्रशांत दबडे, सनियंत्रण सल्लागार यशवंती धत्तुरे , जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे, आर्थिक समन्वयक अर्चना कणकी , समन्वयक आनंद मोची, घनकचरा सल्लागार मुकूंद आकुडे , क्षमता बांधणी महादेव शिंदे, समन्वयक अल्फिया बिराजदार हे विशेष मोहिमेसाठी प्रयत्न करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button