सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ

सोलापूर : जिल्हा परिषदेतील लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पहिला, दुसरा व तिसरा लाभ मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने कर्तव्यनिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे आभार मानण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पदभार घेतल्यापासून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर न्यायाची भूमिका घेतली आहे. अनुकंपा भरती, पदोन्नती व बदलांमध्ये त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे. शासनाच्या आलेल्या आदेशाचे वेळोवेळी पालन करी कर्मचाऱ्यांना अनेक लाभ लागू करण्यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार आहे. युनियनतर्फे राजेश देशपांडे यांनी त्यांच्या आभार मानले. त्याचबरोबर प्रशासन विभागाच्या उप  मुख्य कार्यकारी अधिकारी  स्मिता पाटील , सहाय्यक प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, वरीष्ठ सहाय्यक महेश केंद्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. याप्रसंगी महासंघाचे दिनेश बनसोडे, लक्ष्मण गलगुंदे, राजेश देशपांडे, सुरेश राठोड, प्रमोद धावड, सचिन साळुंखे, सचिन येडशे, लक्ष्मण वंजारी, विजय कुलकर्णी, राजश्री कांगरे, लता बनसोडे, संजय गौडगाव, बसवराज दिंडोरे, महेश भोसले, रेवा म्हेत्रे, नीलेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्विय सहाय्यक सुधाकर माने देशमुख, सुरजरतन नदाफ, मल्लिकार्जुन तलवार यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button