सोलापूरजिल्हा परिषद

अभिनंदन.. यशवंत पंचायत राज अभियानमध्ये सोलापूर झेडपी तृतीय

पंढरपूर पंचायत समितीने पटकावला द्वितीय क्रमांक

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेसाठी आनंदाची बातमी आहे. यशवंत पंचायत राज अभियानामध्ये सोलापूर झेडपीने राज्यस्तरावर 17 लाखाचे तृतीय तर पंढरपूर पंचायत समितीने आठ लाखाचा द्वितीय क्रमांक चा पुरस्कार पटकावला आहे.

यशवंतराव पंचायत समिती अभियान 2023- 24 चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात सोलापूर झेडपीचा तृतीय क्रमांक आला असून पंढरपूर पंचायत समितीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. यशवंत पंचायतराज अभियानात सोलापूर झेडपीला विभागीय स्तरावर पुरस्कार मिळाला आहे. आता सलग दुसऱ्यावर्षी राज्यस्तरीय पारितोषिक मिळाल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सन 2023- 24 च्या काळात तत्कालीन सीईओ मनीषा आव्हाळे यांचेही कामकाज या पुरस्कारासाठी महत्त्वाचे ठरले आहे हे येथे उल्लेखनीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button