सोलापूरजिल्हा परिषद

समाजकल्याणच्या शशीकांत ढेकळेंवर देवळालीच्या आमदारांचे गंभीर आरोप

महिना उलटला तरी सीईओपर्यंत कारवाईची फाईल पोचली नाही

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ सहायक शशिकांत ढेकळे यांच्या कार्यपद्धतीबाबत नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या आमदार  सरोज अहिरे यांनी गंभीर आरोप केले असून यावरून ढेकळे यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना समाज कल्याण आयुक्तांनी कळविले असून महिना लोटला तरी त्यांच्यावर कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.

सोलापूर जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागातील दिव्यांग विभागाच्या कारभाराबाबत देवळालीच्या आमदारांनी  दि.३ एप्रिल २०२४ रोजी समाज कल्याण आयुक्तांना निवेदन दिले आहे. संदर्भिय निवेदनाद्वारे आमदार सरोज अहिरे यांनी  ढेकळे यांच्या कामकाजावर गंभीर आरोप केले आहेत. ढेकळे याच्याकडे दिव्यांग विभागाचे संपूर्ण कामकाज सोपविल्यावर दिव्यांग शाळांना मानधन मंजूर करणे, दिव्यांग शाळांचे शिक्षकांचे वेतन मंजूर करणे, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व कृत्रिम अवयव, साहित्य पुरवठा आदि विषयाबाबत सर्वसामान्य दिव्यांग विषयाबाबत अनियमितता करत आहेत. तसेच ढेकळे यांच्याकडे विशेष वरिष्ठ अधिकारी यांच्या मर्जीमुळे संगनमताने आर्थिक संगनमत करून वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता म्हणून चार्ज असणे, कनिष्ठ लिपिक ढेकळे हे समाजकल्याण विभागांतर्गत सोलापूर जिल्हयातील सतत काही निवडक संस्थाचालक यांच्या मदतीने दिव्यांग शाळांचे कर्मचारी व इतर दिव्यांग शाळांतील कर्मचा-यांकडून शासकीय फाईलची जाणीवपूर्वक अडवणूक करून पैशाची मागणी करत आहेत. ढेकळे यांची या अगोदर समाज कल्याण  विभागातून बदली झाली असताना देखील त्यांची बदली रद्द करण्यात आली आहे. दिव्यांग आयुक्तालयाअंतर्गत शाळांना वेळेवर अनुदान मिळत नाही आणि अनुदान आल्यावर लिपीक ढेकळे हे सदर अखत्यारीतील शाळाना वेठीस धरतात. त्यासाठी ढेकळे हे पैशाची मागणी करतात. व कर्मचारी DCPS Approval देण्यासाठी लाखो रूपयांची मागणी करत असणे, तसेच दिव्यांग आयुक्तालय पुणे या कार्यालयास पाठविण्याचा प्रस्ताव फाईल व त्यावरील शिफारस देणे, तसेच विविध कामांच्या बेकायदेशीर नियमबाहय परवानग्या देणे आदि विषयाबाबत व ढेकळे लिपिक यांच्या कार्यकाळात सर्व मुद्दे व यांच्या कार्यकाळात लेखा परिक्षण यामध्ये आढळून आलेले आक्षेप व सदर आक्षेप कोणते याबाबत तात्काळ कडक कार्यवाही करून केलेल्या कार्यवाही या सर्व मुद्यांच्या अनुषंगाने संबंधित  बाबतची सविस्तर माहिती आमदार सरोज अहिरे यांना विधीमंडळ कामकाजासाठी सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक वि.न.स. २०१३/प्र.क्र.६७/१८/(२.व.क.) दिनांक २७जुलै २०१५ मध्ये तरतुदीनुसार अति तात्काळ उलट टपाली किंवा ईमेल व्दारे उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली आहे.

त्यानुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, संर्भिय निवेदनामध्ये नमुद केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने आपण आपल्यास्तरावरून सविस्तर चौकशी करून त्याबाबतचा अहवाल आपल्या अभिप्रायासह या आयुक्तालयास सादर करावा. तसेच त्याची एक प्रत आमदार सरोज अहिरे असे दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 15 एप्रिल 2025 रोजी कळविले आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे समाज कल्याण विभागाच्या कारभाराबाबत संशय निर्माण झाला आहे.

यापूर्वी होता ठपका…

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी अचानक समाज कल्याण विभागाला भेट दिली होती. त्यावेळी ढेकळे यांच्याकडे अनेक फायली सापडल्या होत्या. याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते पण पुढे त्या चौकशीचे काय झाले हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागातील या कारभाराबाबत ढेकळे यांच्यावर वरदहस्त कोणाचा? याबाबत दबक्या आवाजात वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे.

पुढच्या भागात वाचा…

यामुळे वाढला झेडपीत भ्रष्टाचार? लिपिकांवर क्लास टू चा पदभार कसा?

 बदल्यांमध्ये “या’ लोकांकडे पाहावे लागेल?

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button