सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

बबलाद शाळेतील अपघाताचे सत्य काय? अद्याप दोन मुले ऍडमिट

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील बबलाद जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे प्लास्टर कोसळून 13 विद्यार्थी जखमी झाल्याचे घटना घडलेली असताना दुसऱ्या दिवशी सीईओ कुशल जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन छताला साडीने झोका बांधल्याने घटना घडली व एकही विद्यार्थी ऍडमिट नाही, उपचारानंतर सर्वजण घरी गेले असा दावा केला आहे. पत्रकार परिषदेच्या या बातमीनंतर पालकांनी अद्याप दोन विद्यार्थी रुग्णालयात ऍडमिट असल्याचा फोटो व्हायरल करून झेडपी प्रशासनाचा बुरखा फाडला आहे.

बबलाद झेडपी शाळेत मंगळवारी दुपारी घटना घडली. प्रभात फेरी आटोपून मुले शाळेत परतत असताना, पोर्चमधील छताचे प्लास्टर कोसळल्याने मुले व शिक्षक जखमी झाले. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी झेडपीचे सीईओ जैन यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर जिल्हा परिषदेत येऊन पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी छताचे प्लास्टर पडून घटना घडली, साडीने झोका बांधल्याने प्लास्टर कोसळले असा दावा केला. सर्व जखमींवर उपचार करून घरी सोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेची बातमी व्हायरल झाल्यानंतर काही पालकांनी अद्याप दोन विद्यार्थी ऍडमिट असल्याचा खुलासा केला आहे. त्या विद्यार्थ्यांचे गूगल टॅग फोटोही व्हायरल झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांनी शाळेत कोणताही झोका बांधला नव्हता असे सांगितले आहे. मग सीईओ जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन झोक्यामुळे घटना घडली व सर्व विद्यार्थी उपचारानंतर सुखरूपपणे घरी गेले असल्याचा दावा का केला?  असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोणाला वाचविण्यासाठी प्रशासनाचा हा खटाटोप सुरू केल्याचे पालकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. दीडशे पटसंख्या असलेली बबलादची झेडपी शाळा मोठी आहे. मग या शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून नेमकी घटना काय घडली? याचे उत्तर मिळणे अपेक्षित आहे. या शाळेच्या इमारतीची सहा महिन्यापूर्वीच दुरुस्ती झाल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना गंभीर जखमा असताना काहीच झाले नाही असा दिखावा कशासाठी केला जात आहे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. झेडपी प्रशासनाने घाई न करता बारकाईने चौकशी करून संबंधितावर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे मत पालकांमधून व्यक्त होत आहे.

प्रशांत संजू चांभार, बबलाद शाळेचे विद्यार्थी सध्या ऍडमिट आहे. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर प्रशांत व प्रज्वल बोधले या दोघांना उपचारानंतर सायंकाळी सात वाजता घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी आरबाळे यांनी पत्राद्वारे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना कळविली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button