- सोलापूर : काय म्हणता..! सोलापुरात चक्क गेल्या वर्षभरात मिरवणुका, आंदोलन यासाठी 131 दिवसात 1 हजार 588 परवानग्या पोलिसांकडून घेण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.
पोलीस आयुक्त कार्यालयातून माहिती अधिकार ( RTI ) अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी 2022 ते डिसेंम्बर 2022 या वर्षाच्या 365 दिवसापैकी 131 दिवसात एकूण 1 हजार 588 परवानग्या ह्या मिरवणुकी,रॅली,आंदोलने, पालखी,मोर्चे,सण,उत्सव ईत्यादीकरिता देण्यात आल्या होत्या. यामुळे प्रमुख बाजारपेठ ही 131 दिवस व साप्ताहिक सुट्या 49 असे एकूण 180 दिवस दुकाने,शोरूम व ऑफिस बंद ठेवावी लागतात. म्हणजे जवळ जवळ निम्मे वर्षभर दुकाने बंद ठेवावी लागतात व या दरम्यान भाडे,टॅक्स,लाईटबील,नोकरांचा पगार,देणग्या,असे अनेक खर्च हे चालूच असतात. मिरवणुकी मार्गावर हॉस्पिटल, शाळा व कॉलेज असल्याने त्यांना त्रास तर होतोच शिवाय बॅरेगेट लावून रस्ता पूर्ण बंद ठेवल्यामुळे ऍबुलन्स,फायरब्रिगेड, स्कुलबस जाऊ शकत नाहित. जर सर्वांनी गांभीर्याने विचार नाही केला तर सोलापुरातील दुकानदार,व्यापारी हे गाव सोडून जातील व त्यांच्या कामगारांची उपासमार होईल. अजून बेरोजगारी वाढेल. म्हणून सरकारने या बाबीचा गांभीर्याने विचार करून मिरवणुकीला बाजारपेठेतून न परवानगी देता कोणत्या तरी खुल्या मैदानात व्यवस्था करावी या ठिकाणी संबंधितांना काय देखावे, खेळ,डॉल्बीसाठीची परवानगी द्यावी,त्यामुळे बाजारपेठा बंद ठेवाव्या लागणार नाहीत,वाहतूक सुरळीत होईल व बेरोजगारी होणार नाही. देखाव्याचे मोठं मोठे ट्रेलर,ट्रॅक्टर व ट्रक हे वाहतुकीच्या रस्त्यावर 5 दिवस उभे असतात. यात जनसामान्याचे वाहन रस्त्याच्या बाजूला पार्क केले तरी उचलून नेले जाते किंवा फोटो काढून दंड आकारला जातो, हा दुजाभाव नाही का?? हे सर्व बंद नाही केले तर सोलापूर अजून भकास होऊन जाईल असा इशारा सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांनी दिला आहे. एक महिन्याच्या आत जर प्रशासनाने ठोस निर्णय नाही घेतला तर नाईलाजाने मुंबई उच्च न्यायालयात ( PIL) याचिका दाखल करावी लागेल असेही त्यांनी नमूद केले आहे.

More Stories
सोलापूरचे कलेक्टर म्हणून यांच्याकडे असणार पदभार
अडीच वर्षासाठी सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड होणार 18 मार्चला
सोलापूर मनपा स्थायी समिती सभापतीपदी रंजीता चाकोते बिनविरोध