सोलापूर : राजमाता जिजाऊ यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. जिजाऊ यांचे स्वराज्य निर्मितीसाठी मोठे योगदान आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी येथे बोलताना व्यक्त केले. राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व रक्तदान शिबिराच्या उद्घाटन सीईओ आव्हाळे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले,कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संतोष गाडेकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे,कृषि विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जिल्हा परिषदमधील सर्व जिजाऊ व सावित्री लेकींचा मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यांत आला. त्यानंतर विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन सीईओ मनिषा आव्हाळे यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, माध्यमीक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिता बांगर, कृषि अधिकारी दिपाली शेंडे, पत्रकार रेणुका वठारे, वरिष्ठ सहाय्यक प्रज्ञा कुलकर्णी, वरिष्ठ सहाय्यक नम्रता मिठ्ठा, कनिष्ठ अभियंता मयुरी जावळकोटी, अंगणवाडी पर्यवेक्षीका वसुधंरा जिंदे, ग्रामसेविका सुरेखा सरवळे, प्राथमिक शिक्षिका ओमदेवी घंटे, परिचर छाया क्षीरसागर यांचा सीईओ मनिषा आव्हाळे यांचेहस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन सरस्वती पवार यांनी केले. व ख्यातमान गायक मोहम्मद अय्याज यांच्या राज्यगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

कार्यक्रमास कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटना अध्यक्ष वाय. पी. कांबळे, शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सरचिटणीस निलेश देशमुख, काशीनाथ बिराजदार, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष तजमूल मुतवल्ली, राजेश देशपांडे, विवेक लिंगराज, दिव्यांग संघटनेचे लक्ष्मण वंजारी, ग्रामसेवक संघटनेचे शिवाजी गवळी, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अनिरुद्ध पवार व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन भोसले विशाल भांगे, रोहीत घुले,वासुदेव घाडगे अभिजीत निचळ, आप्पासाहेब भोसले, सचिन पवार, सचिन साळुंखे, सचिन चव्हाण, राम जगदाळे, सुधाकर माने- देशमुख, विशाल घोगरे, गणेश साळुंखे, विकास भांगे, सूर्यकांत मोहिते, सुहास चेळेकर, आनंद साठे, विष्णू पाटील,अविनाश भोसले, हरिभाऊ देशमुख उमेश खंडागळे, अजय चव्हाण, ऋषिकेश जाधव,राहुल शिंदे जयंत पाटील, प्रभाकर माने, भूषण काळे, विकास खंडागळे, प्रकाश शेंडगे, गोपाळ शिंदे, लक्ष्मण अडसुळ, सर्जेराव गाडेकर, विठ्ठल मलपे, उमेश मोरे, आप्पासाहेब सरवळे, अशोक मोरे, अजीत देशमुख, सुभाष तणमोर, संजय डोके, रविंद्र शेंडगे,अश्विनी सातपुते, सविता मिसाळ, सुनिता भुसारे, ज्योत्सा साठे, शुभांगी गवळी, माधुरी भोसले, सुचिता जाधव, अनुपमा पडवळे, प्रतिक्षा गोडसे, भारती धुमाळ, सोनल केत,लक्ष्मी शिंदे . ज्योती लामकाने, माधुरी सुरवसे , यांनी परिश्रम घेतले. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 65 जणांनी रक्तदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *